पंतप्रधान मोदींचे नाव आवडत नाही, मग तुम्ही काम करता “त्या” संस्थेवरचे पंतप्रधानांचे नाव हटवायला का सांगत नाही??; केरळ उच्च न्यायालयाची चपराक


वृत्तसंस्था

तिरुअनंतपुरम : कोरोना व्हायरस व्हॅक्सिन मॅक्सिं सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आणि फोटो नको ते हटविण्यात यावे, अशी याचिका केरळ उच्च न्यायालयात पीटर नावाच्या एका व्यक्तीने दाखल केली. तासाभराच्या सुनावणीनंतर ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. पण ती फेटाळताना याचिकाकर्ते पीटर आणि न्यायालय यांच्यातला संवाद मात्र बराच रंजक झाला आणि तो सध्या सोशल मीडियावर गाजतो आहे. Remove PM Modi’s photo from Covid certificates

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुमचे राजकीय मतभेद असू शकतात. पण काही झाले तरी ते जनतेने त्यांना निवडून दिले आहे. सरकारी कोरोना व्हॅक्सिन्स सर्टिफिकेटवर त्यांचे नाव आणि फोटो असले तर काय बिघडते?, असा सवाल न्यायमूर्ती कुन्नीकृष्णन यांनी याचिकाकर्त्यांना केला. त्यावर पंतप्रधानांचे नाव आवडणे – न आवडणे हा वैयक्तिक विषय आहे, असे याचिकाकर्त्याने उत्तर दिले.


काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर उद्घाटन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कालभैरवनाथाची पूजा


 

त्यावर न्यायमूर्ती कुन्नीकृष्णन यांनी हा वैयक्तिक आवडीनिवडीचा विषय नाही. तुमचे पंतप्रधानांची राजकीय मतभेद असले तरी जनतेने निवडून दिल्यामुळे ते पंतप्रधान आहेत. आणि त्यांचा फोटो सरकारी कोरोना व्हायरस व्हॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर आहे. तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम करतात ती संस्था जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट आहे. ते पण पंतप्रधान होते. मग तुम्ही त्या संस्थेवरचे पंतप्रधानांचे नाव हटवायला सांगणार का?, असा खोचक सवाल न्यायमूर्ती कुन्नीकृष्णन यांनी याचिकाकर्त्याला केला. त्यावर याचिकाकर्त्याला उत्तर देता आले नाही. त्यानंतर पीटर यांची ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

Remove PM Modi’s photo from Covid certificates

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात