Inspiring : बिहारच्या भाजप आमदार श्रेयसी सिंहने घेतला सुवर्णवेध, राष्ट्रीय स्पर्धेत दुसऱ्या सुवर्णपदकावर कोरले नाव


भाजप आमदार आणि राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज श्रेयसी सिंहने पुन्हा एकदा बिहारसह संपूर्ण देशाचा नावलौकिक केला आहे. श्रेयसी सिंह यांनी पतियाळा येथे झालेल्या ६४व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे. त्यांच्या विजयाबद्दल बिहारसह देशभरातून कौतुक होत आहे. एवढेच नाही तर श्रेयसीच्या या यशावर बिहारमधील विविध पक्षांच्या नेत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.Inspiring Bihar BJP MLA Shreyasi Singh wins gold, carved second gold medal in national competition


वृत्तसंस्था

पाटणा : भाजप आमदार आणि राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज श्रेयसी सिंहने पुन्हा एकदा बिहारसह संपूर्ण देशाचा नावलौकिक केला आहे. श्रेयसी सिंह यांनी पतियाळा येथे झालेल्या ६४व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे. त्यांच्या विजयाबद्दल बिहारसह देशभरातून कौतुक होत आहे. एवढेच नाही तर श्रेयसीच्या या यशावर बिहारमधील विविध पक्षांच्या नेत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.JDU नेते आणि बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज आणि जमुईच्या आमदार श्रेयसी सिंहने 64व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेच्या डबल ट्रॅप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून पुन्हा एकदा बिहारचे नाव गौरव केले आहे. या शानदार विजयाबद्दल श्रेयसी यांचे हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. याशिवाय बिहार सरकारमधील मंत्री संजय कुमार झा यांनीही या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

जमुईचे खासदार चिराग पासवान यांनीही ट्विट करून श्रेयसी सिंह यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले, “जमुईच्या आमदार श्रेयसी सिंहचे, पटियाला, पंजाब येथे झालेल्या ६४व्या राष्ट्रीय नेमबाजी डबल ट्रॅप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.”

कोण आहेत आमदार श्रेयसी सिंह

जमुईच्या आमदार श्रेयसी सिंह या माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह आणि बांकाच्या माजी खासदार पुतुल कुमारी यांच्या कन्या आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत श्रेयसी यांनी राजदच्या विजय प्रकाश यांचा तब्बल 41,000 मतांनी पराभव केला होता.

Inspiring Bihar BJP MLA Shreyasi Singh wins gold, carved second gold medal in national competition

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती