कंगना राणावतला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 22 डिसेंबरपूर्वी मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश


अभिनेत्री कंगना राणावतविरोधात दाखल केलेल्या एफआयआरवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने तिला 22 डिसेंबरपूर्वी मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने कृषीविषयक कायदे मागे घेतल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर लिहिले होते की, “खलिस्तानी दहशतवाद्यांनी आज सरकारचे हात मुरडले असतील, पण एका महिला पंतप्रधानाने त्यांना चिरडले होते, हे विसरता कामा नये. मग भलेही यामुळे देशाला कितीही त्रास सहन करावा लागला असो.”Bombay High Court Today Asked Kangana Ranaut To Appear Before Mumbai Police On Dec 22


वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतविरोधात दाखल केलेल्या एफआयआरवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने तिला 22 डिसेंबरपूर्वी मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने कृषीविषयक कायदे मागे घेतल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर लिहिले होते की,

“खलिस्तानी दहशतवाद्यांनी आज सरकारचे हात मुरडले असतील, पण एका महिला पंतप्रधानाने त्यांना चिरडले होते, हे विसरता कामा नये. मग भलेही यामुळे देशाला कितीही त्रास सहन करावा लागला असो.”



या वक्तव्यानंतर कंगनावर अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आली होती. लोक म्हणाले की, कंगना द्वेषाची फॅक्टरी बनली आहे. इंस्टाग्रामवर अशा द्वेषपूर्ण पोस्ट टाकणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी, कंगनाची सुरक्षा आणि पद्मश्री तत्काळ मागे घेण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.

बॉलीवूड अभिनेत्री कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. यापूर्वी ती पंजाबमध्ये असताना आंदोलक शेतकऱ्यांनी किरतपूरमध्ये तिची गाडी अडवली होती. या आंदोलकांच्या हातात झेंडे होते आणि ते घोषणा देत होते. कंगनाने शेतकऱ्यांविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल तिने माफी मागावी अशी मागणी केली.

वाढता तणाव पाहून मोठा पोलीस बंदोबस्तही घटनास्थळी पाचारण करण्यात आला. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. तब्बल दोन तासांनंतर कंगनाने अखेर माफी मागितल्यानंतर शेतकऱ्यांनी तिला जाऊ दिले होते.

Bombay High Court Today Asked Kangana Ranaut To Appear Before Mumbai Police On Dec 22

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात