कॅटरिना आणि विकीच्या वयात असलेल्या अंतरावर काय म्हणाली कंगना राणावत?


विशेष प्रतिनिधी

मुबंई : जयपूरमध्ये कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाचे विधी सुरू आहेत. मीडिया, सेलिब्रेटी तसेच कॅटरिना आणि विकीचे चाहते या लग्नानिमित्त खूपच एक्साइटेड असल्याचे दिसून येत आहेत. याच पाश्र्वभूमीवर अभिनेत्री कंगना रणौतने एक विधान केले आहे. ते सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

What Kangana Ranaut has to say about the age gap between Katrina and Vicky?

कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे की, आम्ही जेव्हा लहान होतो, तेव्हा साधारणत असे पाहायला मिळायचे की एक यशस्वी उद्योगपती वयाने अतिशय लहान असणाऱ्या मुलीसोबत लग्न करायचे. त्या काळात एका ठरावीक वयानंतर मुलीचे लग्न होणे देखील कठीण असायचे. एखादी महिला आपल्या नवऱ्यापेक्षा जास्त यशस्वी झाली तर ती गोष्ट एका संकटाच्या स्वरूपामध्ये पाहिली जायची. पण सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे सर्व बदलताना दिसत आहे. अनेक श्रीमंत आणि यशस्वी अभिनेत्री वयाने लहान असणाऱ्या तरुण अभिनेत्यासोबत लग्न करताना दिसून येत आहेत. आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे. असे तिने आपले मत मांडले आहे.


कॅटरिना आणि विकीच्या शाही लग्न सोहळ्यात चक्क थायलंड वरून भाजी आणलीये ?


कंगनाच्या या स्टोरी वर बऱ्याच लोकांनी मिक्स प्रतिक्रिया दिल्या आहेत. गोड बोलून टोमणा मारला आहे असे देखील बऱ्याच लोकांनी म्हटले आहे. तर तिने जो मुद्दा मांडला आहे तो देखील बऱ्याच लोकांनी सपोर्ट केला आहे.

What Kangana Ranaut has to say about the age gap between Katrina and Vicky?

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था