कॉँग्रेस १० वर्षांत ५० हून अधिक निवडणुका हारली, प्रशांत किशोर यांची टीका


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राहूल गांधी यांना उभे केले. मात्र, लोकांनी त्यांना स्वीकारले नाही. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांत कॉग्रेस ५० हून अधिक निवडणुका हरली असल्याची टीका रणनितीकार प्रशांत किशोर यांनी केली आहे.Congress loses more than 50 elections in 10 years, criticizes Prashant Kishor

पंतप्रधान गेल्या ५० वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय जीवनात आहेत. त्यांनर लोकांशी संवाद साधणे, त्यांना समजून घेणे या गोष्टी आत्मसात केल्या आहेत,असेही ते म्हणाले.
प्रशांत किशोरम्हणाले, विरोधी पक्ष म्हणजे केवळ काँग्रेसच आहे का, अशी विचारणा केली आहे.तुम्ही पंतप्रधान मोदींचे भक्त आहात की, राहुल गांधी यांचे समर्थक या बायनरीमुळे विरोधकांना नुकसान होत आहे. परिस्थिती अधिक आव्हानात्मक आणि तितकीच गुंतागुंतीची आहे. एकूणच राजकीय आणि देशातील परिस्थितीचा बारकाइने विचार करण्याची गरज आहे आणि त्यानंतरच एखादी रणनीति आखली गेली पाहिजे. एक पक्ष म्हणून काँग्रेसचा ग्राफ पडत आहे. काँग्रेस गेल्या १० वर्षात ५० हून अधिक निवडणुकीत पराभूत झाली आहे.

कर्नाटक, पंजाब, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचा विजय झाला असला तरी ज्या पद्धतीने काँग्रेस नेते जनतेत जातात, त्यांच्यात मिसळतात, त्यांच्याशी संवाद साधतात, त्यात काही गडबड आहे. विरोधी पक्ष म्हणजे केवळ काँग्रेस नाही. इतरही पक्ष आहेत. १९८४ नंतर काँग्रेसने कोणतीही सार्वजनिक निवडणूक जिंकलेली नाही.

त्यानंतर १५ वर्ष सत्ता उपभोगली असली तरी १९८९ मध्ये काँग्रेसला १९८ जागा मिलाल्या होता. तरी सरकार बनले नाही. २००४ मध्ये तर केवळ १४५ जागा मिळाल्या होत्या. आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन करण्यात आले. एक पक्ष म्हणून काँग्रेसचा ग्राफ पडत आहे हे यातून दिसून येते.

प्रशांत किशोर म्हणाले, भूतकाळात जे झाले, ते पाहून काही धडे घेतले पाहिजेत. २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात निवडणुका होत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात जो निकाल येईल तोच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही कायम असेल असे नाही. यूपीत जे होईल तेच लोकसभेला होईल, अशी अनेकांची धारणा असून ती चुकीची आहे.

भाजपला पराभूत करायचे असेल तर भाजपच्या विरोधात सर्वच पक्षांनी एकत्र येण्याची गरज नाही. आसाम आणि उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये भाजपविरोधी महाआघाडी करण्यात आली होती. मात्र, त्याचे काय झाले हे तुम्हाला माहिती आहे. भूतकाळात जे झाले, ते पाहून काही धडे घेतले पाहिजे.

केवळ सर्व पक्षांनी भाजपच्या विरोधात एकत्र येणे हा काही रामबाण उपाय नाही. त्यासाठी तुम्हाला एक चेहरा हवा. एक विचार हवा. आकडा असावा. प्रचारासाठी मशिनरी हवी. या गोष्टी असतील तर भाजपच्या विरोधात आव्हान उभे करू शकता.

पंतप्रधान गेल्या ५० वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय जीवनात आहेत. त्यातील १५ वर्ष ते आरएसएसचे प्रचारक होते. त्यामुळे त्यांनी लोकांशी संवाद साधणे, त्यांना समजून घेणे या गोष्टी आत्मसात केल्या आहेत. त्यानंतर त्यांनी १० ते १५ वर्ष भाजपचे संघटक म्हणून काम पाहिले आहे.

कोणत्याही मुद्द्यावर अनेक लोकांकडून माहिती जाणून घेण्याचा त्यांचा गुण आहे. भाजपची राजकीय ताकद संपवणे कठीण आहे. भाजपला इथवर कोणी आणले आहे, हे पाहिले पाहिजे. एक संघटना म्हणून ५० ते ६० वर्ष त्यांनी काम केले आहे, असेही प्रशांत किशोर यांनी सांगितले.

Congress loses more than 50 elections in 10 years, criticizes Prashant Kishor

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*