राजीव सातव यांची प्रकृती खालावली; राहुल गांधींची पुण्यातील डॉक्टरांशी चर्चा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना कोरोना झाला आहे. पुण्यातील जहांगीर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी डॉक्टरांना फोन करून राजीव सातव यांच्या प्रकृतीची चौकशी केली.Rajiv Satav’s health deteriorated;Rahul Gandhi’s discussion with doctors in Pune

कोरोनाची लागण झाल्याची माहिती राजीव सातव यांनी ट्विट करून २२ एप्रिलला दिली होती. “सौम्य लक्षणं जाणवल्यानंतर चाचणी केली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. माझ्या संपर्कात आलेल्यानी नियमांचं पालन करावे,” असं आवाहन त्यांनी केले होते.



पुण्यातील जहांगीर रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत.त्यांची प्रकृती बिघडली असून मुंबईमधील लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमला बोलावले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोन करुन जहांगीरमधील डॉक्टरांकडे राजीव सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राहुल गांधी आणि डॉक्टरांमध्ये बराच वेळ चर्चा सुरु होती, असे वृत्त आहे.

Rajiv Satav’s health deteriorated;Rahul Gandhi’s discussion with doctors in Pune

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात