मिशन ‘अमृत सरोवर’मुळे देशातील पाण्याचा प्रश्न सुटणार! ४० हजारांहून अधिक अमृत तलाव तयार

PM Modi and amrit sarovar

१५ ऑगस्ट २०२३ पर्यंत देशातील अमृत सरोवरांची संख्या ५० हजारांवर गेलेली असणार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने देश आज अनेक क्षेत्रात स्वयंपूर्ण होत आहे. भारताने जलसंधारणाच्या दिशेने मोठे यश मिळवले आहे. आतापर्यंत देशभरात ४० हजारहून अधिक अमृत सरोवर बनवण्यात आले आहेत. एप्रिल २०२२ मध्ये मिशन अमृत सरोवर सुरू झाल्यानंतर ११ महिन्यांच्या अल्प कालावधीत हे यश प्राप्त झाले आहे. Mission Amrit Sarovar will solve the countrys water problem More than 40 thousand Amrit Lakes ready

या अभियानांतर्गत यावर्षी १५ ऑगस्टपर्यंत ५० हजार अमृत सरोवर बनवण्याचे उद्दिष्ट आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवर बनवण्याचा संकल्प वेगाने आकार घेत आहे. ‘मिशन अमृत सरोवर’ सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांत २५ हजारांहून अधिक अमृत सरोवराचे बांधकामही पूर्ण झाले. पंतप्रधान मोदींची ही दूरदृष्टी आहे, ज्यामुळे देशभरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल आणि भविष्यात देशात दुष्काळ किंवा पाणीटंचाई निर्माण झाली तर अमृत सरोवर खूप उपयुक्त ठरेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन अमृत सरोवरचे कौतुक केले आहे. देशभरात ज्या वेगाने अमृत सरोवर बांधले जात आहेत त्यामुळे अमृत कालच्या आमच्या संकल्पांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ४० हजारांहून अधिक अमृत सरोवर राष्ट्राला समर्पित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी एका ट्विट संदेशात दिली आहे. तर, १५ ऑगस्ट २०१३ पर्यंत ५० हजार अमृत सरोवर बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

देशातील प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवर बांधण्यात आल्याने भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या या संकल्पामुळे संपूर्ण देशातील जलसंकटाची मोठी समस्या दूर होईल आणि आपल्या भावी पिढ्यांचे जीवनही सुरक्षित होईल. त्याचबरोबर देशातील दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. बुंदेलखंडसारख्या भागातील पाण्याचे तीव्र संकट संपुष्टात येऊ शकते. येत्या काही दिवसांत त्याचे फायदे लहान शेतकरी, महिला आणि पक्षी आणि प्राण्यांसाठीही खूप फायदेशीर ठरतील.

Mission Amrit Sarovar will solve the countrys water problem More than 40 thousand Amrit Lakes ready

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात