China Arunachal rename: चीनकडून कुरापती सुरूच; आता अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची नावे बदलली!


नावं बदलल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही, भारताने चीनला ठणकावले.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: चीन आपल्या विस्तारवादी धोरणाखाली अनेक डावपेचांचा वेळोवेळी अयशस्वी प्रयत्न करत आहे. आता अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांना चीनने नवीन नावे दिली आहेत. विशेष म्हणजे अरुणाचल प्रदेशवर चीन सातत्याने दावा करत आहे.  मात्र भारतानेही चीनचे प्रयत्न प्रत्येकवेळी हाणून पाडले असून, परखड शब्दांत सुनावले आहे.  China changed the names of 11 places in Arunachal Pradesh

चीनच्या मंत्रालयातून ११ ठिकाणांची नवीन नावे समोर आली आहेत. यामध्ये दोन भूभाग, दोन निवासी क्षेत्रे, पाच पर्वत शिखरे आणि दोन नद्या जोडण्यात आल्या आहेत. चिनी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी यासंबंधीची माहिती मिळाली आहे. चीनच्या नागरी मंत्रालयाच्या नोंदींमध्ये अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याची ही तिसरी वेळ आहे.


सिक्कीमच्या नाथुला येथे हिमस्खलनात सात पर्यटकांचा मृत्यू, अनेक जखमी


यापूर्वी २०१७ मध्ये सहा आणि २०२१ मध्ये १५ ठिकाणांची नावे चीनने बदलली आहेत. पण प्रत्येकवेळी चीनला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. भारताने या अगोदर चीनचे असे प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडले. राज्य नेहमीच भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील असे भारताने नेहमी ठणकावून सांगितले आहे. नाव बदलल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही, असं भारताने सांगितलं आहे.

‘’आम्ही यासंदर्भातल्या बातम्या वाचल्या. चीनकडून असा प्रयत्न पहिल्यांदाच होत नाहीये. आम्ही ही यादी फेटाळून लावत आहोत. अरुणाचल प्रदेश हा भारताचाच अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहणार आहे”, अशा शब्दांत भारतीय परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी चीनला सुनावलं आहे.

यापूर्वी, २०२१ मध्ये चीनने नाव बदलले तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी डिसेंबर २०२१ मध्ये म्हटले होते की, चीनने नाव बदलण्यासारखे काही प्रथमच केले नाही. अरुणाचल प्रदेश हा नेहमीच भारताचा अविभाज्य भाग होता आणि राहील. चीन कोणतेही नाव बदलू द्या, पण नाव बदलल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही.

China changed the names of 11 places in Arunachal Pradesh

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात