त्या लिफाफ्यामध्ये प्लास्टिकची दोन पाकिटं हाती लागली.त्या पाकीटांमध्ये दोन-दोन नाणी होती. Kerala: Authorities suspect two gold coins found at the airport
विशेष प्रतिनिधी
केरळ : केरळच्या कालिकत विमानतळावर एकाला अटक करण्यात आली आहे.चपलेतून सोन्याची तस्करी करणाऱ्याला विमानतळावर अटक करण्यात आली आहे.विमानतळावर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांमुळे सोन्याच्या तस्करीचा हा डाव उधळला गेला आहे.
दुबईहून कालिकत विमानतळावर दाखल झालेल्या एका व्यक्तीची अधिकाऱ्यांनी चौकशी केली.चौकशीदरम्यान त्याच्याकडे असलेलं सामान तपासण्यात आलं.मात्र काहीही आढळून आलं नाही.दरम्यान एका अधिकाऱ्यांचं लक्ष त्या व्यक्तीच्या चपलांकडे गेलं.त्याच्या चपलांची शिलाई काहीशी वेगळीच दिसत होती. शिलाई नुकतीच करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं.
दरम्यान अधिकाऱ्यांनी प्रवाशाला चप्पल काढण्यास सांगितलं.यावेळी त्याच्या चप्पल ची शिलाई काढण्यात आली.दरम्यान त्यातून एक लिफाफा हाती लागला. त्या लिफाफ्यामध्ये प्लास्टिकची दोन पाकिटं हाती लागली.त्या पाकीटांमध्ये दोन-दोन नाणी होती.दोन्ही चपलांमध्ये अधिकाऱ्यांना सोन्याची नाणी सापडली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App