आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा!
विशेष प्रतिनिधी
भाजप नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. राधिका खेडा यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आणि जो देशभक्त… रामभक्त आणि सनातनवर विश्वास ठेवतो तो काँग्रेसमध्ये राहू शकत नाही, असे सांगितले. 4 जूनपर्यंत काँग्रेसचे अनेक बडे नेते पक्ष सोडणार आहेत. देशाबद्दल बोलणाऱ्याला या पक्षात राहता येणार नाही, असेही ते म्हणाले.If the Congress government is formed Rahul Gandhi will reverse the Ram temple decision Acharya Pramod Krishnams big claim
यावेळी त्यांनी राहुल गांधींबाबतही मोठा दावा केला. ते म्हणाले की, राम मंदिराच्या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या निकटवर्तीयांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी काँग्रेसचे सरकार आल्यानंतर महासत्ता समिती स्थापन करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर समितीच्या शिफारशींच्या आधारे शाहबानोचा निर्णय ज्याप्रकारे उलटवला गेला त्याचप्रमाणे राम मंदिराचा निर्णयही रद्द करण्यात येणार आहे.
प्रमोद कृष्णम म्हणाले की, 32 वर्षे मी काँग्रेसमध्ये राहिलो, राहुल गांधी आणि त्यांच्या टीमला कोणत्या ना कोणत्या निमित्ताने हा देश तोडायचा आहे. पूर्वीची काँग्रेस आणि आताची काँग्रेस यात खूप फरक आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App