आजारपणाला “गाडून” पवार पुन्हा मैदानात; पण पुढचे 3 दिवसांचे दौरे बारामती + नगर + पुणे आणि साताऱ्यात!!


विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी एका दिवसात आजारपणावर मात केली आहे. त्यांचा बसलेला घसा आता काहीसा बरा झाला आहे आणि शरद पवारांचा पुढचा तीन दिवसांचा दौरा दस्तुरखुद्द आमदार रोहित पवारांनी जाहीर केला आहे. आजारपणावर एक दिवसात मात करून योद्धा पुन्हा मैदानात, असे जाहीर करून रोहित पवारांनी शरद पवार पुढच्या तीन दिवसांमध्ये बारामती, नगर, पुणे आणि सातारा या पट्ट्यात फिरणार असल्याचे जाहीर केले आहे.Sharad pawar now fit and fine, will tour baramati, pune, nagar and satara



त्याचवेळी त्यांनी अजितदादांना उद्देशून हातात वस्तरा घेऊन मिशा भादरण्यासाठी तयार राहा, असा इशारा दिला आहे.

शरद पवार नेमके कुठून केव्हा निघणार??, ते कुठे लँड होणार??, तिथे ते नेमके काय करणार याची तपशील रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून दिले आहेत. त्यानुसार पवार पुणे जिल्हा, नगर जिल्हा आणि सातारा जिल्हा या तीनच जिल्ह्यांमध्येच पुढच्या तीन दिवसांमध्ये फिरणार आहेत.

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांपैकी 10 जागांवर निवडणूक लढवत आहे. पवारांनी या 10 जागांवर लक्ष केंद्रित करत 22 दिवसांमध्ये 52 सभा घेतल्या. त्यातल्या 35 ते 40 सभा बारामती, माढा आणि शिरूर मतदारसंघांमधल्या होत्या. उर्वरित 12 ते 15 सभा इतरत्र होत्या.

पवारांचे वय 84 आहे. त्यामुळे वयमानपरत्वे त्यांनी केलेला प्रवास, त्यांना झालेली दगदग, त्यामुळे त्यांचा आवाज बसला होता. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी आज दिवसभर पुण्यात “1 मोदी बाग” या निवासस्थानी विश्रांती घेतली. पण या विश्रांती दरम्यान त्यांनी आपल्या समर्थक कुटुंबीयांकडून बारामती लोकसभा मतदारसंघाची तपशीलवार माहिती घेतली. कारण तिथे उद्या 7 मे 2024 रोजी मतदान आहे. उद्या पवारांचा दौरा पुण्यातून सुरू होऊन बारामतीत जाईल. त्यानंतर ते इतरत्र टप्प्याटप्प्याने तीन दिवस प्रवास करतील. पवारांची एकच सभा पुणे, नगर आणि सातारा जिल्हा वगळून होणार असून, ती बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाईत होणार आहे.

Sharad pawar now fit and fine, will tour baramati, pune, nagar and satara

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात