विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – देशात इंधन दरवाढीचा भडका कायम असून गेल्या दीड वर्षात पेट्रोल तब्बल ३६ रुपयांनी तर डिझेल २६.५८ रुपयांनी महागल्याचे स्पष्ट झाले आहे. देशभरातील १२ हून अधिक राज्यांत डिझेलची शंभर रुपयांपेक्षा अधिक दराने विक्री होत आहे.Diseal rates croseed 100 rs mark
देशातील सर्व प्रमुख शहरांत पेट्रोलने शंभरी ओलांडली असून डिझेल देखील शंभर आकडा पार करण्याच्या तयारीत आहे. मे २०२० पासून ते आजतागायत १८ महिन्यांत अगदी कमी काळात पेट्रोल ३६ रुपयांनी तर डिझेल २६.५८ रुपयांनी महागले आहे.
विशेष म्हणजे कच्च्या तेलाचे दर हे १९ डॉलर प्रती बॅरल इतक्या नीचांकी पातळीवर पोचल्यावरही सरकारने इंधनावर उत्पादन शुल्क वाढवले होते. त्यानंतर आता हाच दर ८५ डॉलर प्रती बॅरल झाला आहे. तरीही पेट्रोलवरील उत्पादन शुल्क ३२.९ रुपये प्रति लिटर कायम आहे. डिझेलवरील उत्पादन शुल्क हे ३१.८ रुपये प्रति लिटर आहे.
उत्पादन शुल्कात का घट नाही मध्य प्रदेशच्या भोपाळसह काही जिल्ह्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. अनूप्पूर जिल्ह्यात पेट्रोल ११९ रुपये प्रति लिटर तर डिझेल १०८ रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App