विरोधकांच्या दबावापुढे झुकणार नाही, अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय पंतप्रधानच घेणार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लखीमपूर खेरी हिंसाचारात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या कथित सहभागाचे भांडवल करून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र पोलीस तपास पूर्ण झाल्यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. विरोधकांच्या दबावाखाली कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही.Bjp will not bow to the pressure of the opposition, the final decision on the resignation of Ajay Mishra will be taken by the Prime Minister

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्र्यांनी या घटनेत आपल्या मुलाचा सहभाग असल्याचा आरोप नाकारला आहे. पोलिसांना त्याच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. या घटनेत आशिष मिश्रा यांचा सहभाग दाखवणारे पुरावे असल्यास, सर्वोच्च नेतृत्व निर्णय घेईल. भाजप केवळ दबावाखाली येणार नाही. विरोधी पक्ष राकरणातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.



लखीमपूर खेरी येथील घटनेचा पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कोणताही परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे भाजपचे म्हणणे आहे. तरीही पोलीस तपासात काय पुढे येते यावरच पक्षाचा अंतिम निर्णय अवलंबून असल्याचे एका नेत्याने सांगितले.

दरम्यान, काँग्रेस पक्षाने सोमवारी मूक धरणे आंदोलन करून सत्ताधारी भाजपवर मिश्रा यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातून अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीही मिश्रा यांना सरकारमधून काढून टाकण्याची मागणी केली.तेमंत्री म्हणून कायम राहिल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Bjp will not bow to the pressure of the opposition, the final decision on the resignation of Ajay Mishra will be taken by the Prime Minister

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात