Navnath Ban : रोहित पवारांना राहुल गांधींसारखी खोटं बोलण्याची सवय; मनसे, उबाठाला विद्यार्थ्यांशी काही देणंघेणं नाही- नवनाथ बन

Navnath Ban

विशेष प्रतिनिधी

मुबई : Navnath Ban रोहित पवार हे जाणीवपूर्वक रोज खोटे बोलत आहेत, अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे. राहुल गांधींप्रमाणेच रोहित पवारांनाही खोटे बोलण्याची सवय लागल्याचा दावा त्यांनी केला. मतदारसंघात कामे करायची नसल्याने केवळ खोट्या गोष्टी पसरवणे एवढेच काम त्यांच्याकडे उरले आहे, असा टोलाही बन यांनी लगावला. रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एमपीएससीचा पेपर फुटल्याचा दावा केला होता, परंतु खुद्द संबंधित विद्यार्थ्यानेच असा आरोप करायचा नव्हता, असे स्पष्ट केल्याचे नवनाथ बन यांनी निदर्शनास आणून दिले.Navnath Ban

नवनाथ बन म्हणाले की, जेन झीच्या नावाने देशात अराजकता पसरली पाहिजे एवढाच संजय राऊत यांचा उद्देश आहे. त्या उद्देशापोटी तरुणांचे माथी भडकवण्याचा उद्देश मनसे, उबाठा आणि संजय राऊतांसह काही लोकांचा आहे. नेपाळ, बांगलादेश सारखी परिस्थिती आपल्या देशात होणार नाही कारण देशातील तरुण देशभक्त आहेत. राऊतांचा उद्देश कधीही पूर्ण होणार नाही तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी आहे.Navnath Ban



निष्ठा ‘वंदे मातरम’शी नाही तर मदरशांशी

नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा हे रोज तरुणांशी संवाद साधतात. संसदेत सुद्धा आम्ही चर्चेला तयार आहोत. पण चर्चेपासून राऊतांचे नवीन मालक राहुल गांधी पळ काढत आहेत. 60 वर्षांमध्ये तुम्हाला 370 हटवता आले नाही, ते अमित शहा यांनी हटवले आहे. वंदे मातरम सक्तीचे करण्यासाठी देशाला 70 वर्षे लागले अनेकांनी त्याला विरोध केला भाजपने ते सक्तीचे केले. म्हणून उबाठाच्या पोटात दुखायला लागले. कारण तुमची निष्ठा वंदे मातरमसोबत नाही तर मदरशासोबत आहे, म्हणून तुम्ही विरोध करत आहात. पेपरफुटीचे विधेयक सुद्धा पास होईल, या चर्चेसाठी विरोधक पळ काढत आहे.

पंतप्रधान तरुणांशी संवाद साधताय

नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे हे अहंकारी आहे, हे त्यांच्या दोन अडीच वर्षांच्या कार्यकाळात दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मिडीयाच्या माध्यमातून दररोज तरुणांशी संवाद साधत आहेत. हजारो- लाखो विद्यार्थ्यी त्यांचे टविट पाहत आहेत म्हणून राऊतांना त्रास होत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील मोटेगावकर कोणत्या पक्षाचे आहे ते राऊतांनी सांगतले पाहिजे. ते अमित देशमुख यांचे कार्यकर्ते आहेत असे जाहीरपणे सांगत होते, त्यांना राऊतांनी प्रश्न केला का? असा सवाल बन यांनी केला आहे.

Navnath Ban Slams Rohit Pawar Over MPSC Exam Controversy, Compares to Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात