विद्यार्थी आंदोलनात गोळीबार केलाच नाही; राहुल गांधींच्या आरोपांचे सरकारकडून लोकसभेत खंडण

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : विद्यार्थी आंदोलनात कुठेही गोळीबार केलाच नाही. फक्त अश्रूधुराचा वापर केला, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या आरोपांचे खंडण केले. राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गोळीबाराचा आदेश दिल्याचा आरोप केला होता.

– गोळीबार नाही, फक्त अश्रूधुराचा वापर

लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयकाच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, “विद्यार्थी आंदोलनावर कुठेही गोळीबार केला नाही, फक्त अश्रूधुराचा वापर करण्यात आला, हे वारंवार स्पष्ट करण्यात आले होते. गोळीबार झाला नसल्यामुळे, आदेश जारी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण असा आदेश जारी करण्याचा अधिकार मॅजिस्ट्रेटकडे म्हणजे दंडाधिकाऱ्यांकडे असतो, कुठल्याही मंत्र्यांकडे नसतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.”


– लोककल्याण मार्गावरच्या बंगल्यात बसायाची इच्छा अपूर्ण

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, “२१ जुलै रोजी विरोधी पक्षनेते (राहुल गांधी) कदाचित एखाद्या विशिष्ट विचाराने प्रेरित होऊन पंतप्रधान निवासस्थान असलेल्या ‘७ लोक कल्याण मार्ग (7 LKM) बाहेर जाऊन बसले. देशाच्या जनतेने आपल्याला निवडून द्यावे आणि ‘७ एलकेएम’मध्ये आपल्याला स्थान मिळावे, अशी त्यांची तीव्र इच्छा असावी असे वाटत होते. जेव्हा ती आकांक्षा पूर्ण झाली नाही, तेव्हा ते निराश आणि हताश झाले आणि ‘७ एलकेएम’च्या प्रवेशद्वारावर जाऊन बसले. जेव्हा त्यांना अत्यंत नम्रपणे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला गेला की असे वर्तन त्यांच्या पदाला किंवा प्रतिष्ठेला साजेसे नाही, तेव्हा त्यांनी केवळ ‘मला इथून हटवावे’ असे उत्तर दिले…”

जितेंद्र सिंह म्हणाले, “जेव्हा परीक्षा सुधारणा विधेयकासारख्या महत्त्वाच्या विधेयकावर चर्चा सुरू असते, तेव्हा त्या संदर्भात विधायक सूचना करण्याऐवजी त्यावरून फक्त राजकारण केले जात आहे. विरोधी पक्षनेत्यांनी वापरलेली असंसदीय भाषा धक्कादायक आहे; त्यांना संसदीय कामकाजाच्या मूलभूत संकेतांची तरी जाणीव आहे का??,, असा प्रश्न मला पडतो… या देशाचे भविष्य असलेल्या तरुणांना ‘मूर्ख’ (idiots) म्हणण्यापेक्षा अधिक दुर्दैवी बाब दुसरी कोणती असू शकते??”

itendra Singh says, “It was repeatedly clarified that no shots were fired

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात