Dattatray Bharne : कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच; 16 लाख 95 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ, काळजी न करण्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

Dattatray Bharne

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Dattatray Bharne राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’बाबत शेतकऱ्यांना मोठी आनंदवार्ता दिली असून, ही संपूर्ण योजना एकूण तीन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. यापूर्वी 22 जुलै रोजी अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारने 533 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या दुसऱ्या यादीतील लाभार्थ्यांचा आकडाही समोर आला आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या काही अटी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे.Dattatray Bharne

यावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना आश्वस्त करतो, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यात एकावर पीक कर्ज होते आणि यादीत नाव आले नाही असे त्यांना वाटले. कर्जमाफीच्या अटीत बसतील, अजून 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच कागदपत्रांचीह पूर्तता केल्यावर लाभ लगेच शेतकऱ्यांना मिळणार असून कर्जमाफी ही तीन टप्प्यात राबवण्यात येणार असल्याची माहिती भरणे यांनी दिली आहे.Dattatray Bharne



 

दुसर्‍या यादीत 16 लाख 95 हजार शेतकरी

पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होत आहे, दुसर्‍या यादीत 16 लाख 95 हजार शेतकरी असल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले. जशा याद्या कागदपत्र पूर्ण होतील तशा याद्या लागतील. यादीत नाव असेल किंवा नसेल पूर्तता झाली की नाव येईल. याद्या प्रसिद्ध होतील, काळजी करू नका, असे आश्वासन भरणे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.

शेतकऱ्यांना 40 हजार कोटी रुपयांची रक्कम दिली जाणार

तसेच शेतकऱ्यांना 40 हजार कोटी रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. थकबाकी 2 लाखांची रक्कम माफ केली जाणार आहे. तक्रारी असतील तर दुरुस्त केली जाणार आहे. कर्जमाफीची योजना सुटसुटीत आहे. यादीत योग्य कागदपत्र दिली तर लाभ नक्कीच मिळणार आहे. अमरावतीत सर्वाधिक जास्त पेरणी झाली आहे. सर्वात कमी पेरणी ठाण्यात झाली आहे. तसेच पावसाचा अंदाज घेत पेरणी होत असल्याचे भरणे यांनी म्हटले आहे. तसेच पालघर येथे मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे, या संदर्भात निश्चित मदत केली जाईल, आमचे सरकार शेतकऱ्यांच्यासोबत असल्याचे भरणे म्हणाले.

दरम्यान, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यावर प्रतिक्रिया देताना दत्तात्रय भरणे म्हणाले, शरद पवार हे देशाचे नेते आहेत. पवार यांची भेट घेणे, आशीर्वाद घेणे मला कुठेही चुकीचे वाटत नाही.

Second List of Loan Waiver Scheme Soon: 16.95 Lakh Farmers to Benefit, Says Dattatray Bharne

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात