स्टुडंट्स, इडियट आणि अंधभक्त; राहुल गांधींचे लोकसभेत भाषण, गृहमंत्र्यांवरही आरोप; नंतर गोंधळ गदारोळ सभागृह स्थगित!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मोदी सरकारने आणलेल्या परीक्षा सुधारणा विधेयकावर आज लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे लोकसभेत भाषण झाले. त्यांच्या भाषणामध्ये विधेयकातल्या सुधारणा सुचविण्यापेक्षा वादग्रस्त शब्दच जास्त होते. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थी संकल्पनेची व्याख्या केली. ते इडियट शब्द म्हणाले. त्यानंतर अंधभक्त शब्द म्हणाले. त्यामुळे लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर राहुल गांधींनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर त्यांनीच विद्यार्थ्यांवर पॅलेट गन मधून गोळ्या चालवायचा आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळे लोकसभेतल्या गदारोळ आणखी प्रचंड वाढला. त्यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी स्थगित करावे लागले.

राहुल गांधींचे भाषण

एका विद्यार्थिनीशी झालेल्या संभाषणाची आठवण सांगताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, “ती म्हणाली की, एक प्रकारचा विद्यार्थी अभिमानाने सत्याची कास धरतो. मी विचारले, मग दुसऱ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांचे काय? ती म्हणाली, दुसऱ्या प्रकारच्या विद्यार्थ्याला एका ‘प्रतिमे’ची (इमेज) गरज असते. त्याला प्रतिमेची गरज असते आणि ती प्रतिमा खरी नसते — कारण ती मूर्ख व्यक्ती आपण ‘देव’ आहोत असे भासवण्याचा प्रयत्न करत असते — त्यामुळे त्याला ती प्रचंड मोठी प्रतिमा निर्माण करावी लागते. मी तिला एक प्रश्न विचारला, मग तिसरा प्रकार कुठे जातो? तो म्हणजे ‘अंधभक्त’. ती म्हणाली, ‘अंधभक्त’ म्हणजे अशी व्यक्ती जिची ठाम खात्री असते की, समोरचा दुसरा मूर्ख माणूस हाच ‘देव’ आहे…”



संसदीय कामकाज मंत्र्यांचा आक्षेप

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यावर लगेच आक्षेप घेतला. राहुल गांधींच्या भाषणात हस्तक्षेप करताना ते म्हणाले, “राहुल गांधींनी असंसदीय शब्द वापरला नसता, तर कोणीही आक्षेप घेतला नसता. मला वाटते की ते एका विद्यार्थ्याच्या संदर्भात तो शब्द वापरत आहेत, पण प्रत्यक्षात तेच तो शब्द वापरत आहेत… ते असंसदीय शब्द वापरू शकत नाहीत, तो शब्द कामकाजातून वगळला गेला पाहिजे…”

राजनाथ सिंहांचा हस्तक्षेप

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “मी नम्र विनंती करतो की, विरोधी पक्षनेत्यांनी वापरलेला असंसदीय शब्द कामकाजाच्या नोंदीतून वगळण्यात यावा आणि माझ्या बाजूच्या सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी शांत राहावे व त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे.”

गृहमंत्र्यांवर आरोप

त्यानंतर राहुल गांधींनी आपले भाषण पुन्हा सुरू केले. त्यामध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सभागृहात उपस्थित नसल्याबद्दल आक्षेप व्यक्त केला. त्यावर ज्यांचे विधेयक लोकसभेत चर्चेला आहे, ते मंत्री लोकसभेत हजर आहेत, असे सभापती ओम बिर्ला यांनी राहुल गांधींच्या निदर्शनाला आणून दिले. तरीसुद्धा राहुल गांधींनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावरचे आरोप आणि आक्षेप मागे घेतले नाहीत. मी गृहमंत्र्यांना कारमध्ये बसताना पाहिले ते कारमध्ये घाबरलेले दिसत होते. गृहमंत्र्यांनीच विद्यार्थ्यांवर पॅलेट गन मधून गोळ्या चालवायचे आदेश दिले, असा आरोप राहुल गांधींनी केला. त्यामुळे सत्ताधारी बाकावरचे सदस्य प्रचंड संतापले. त्यामुळे लोकसभेतला गदारोळ प्रचंड वाढला. ओम बिर्ला यांना सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले.

Recollecting his conversation with a student, Lok Sabha LoP Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात