कोरोना योद्धा: विधवेला घरपोच अन्नपुरवठा; ऑनलाइन स्पर्धेद्वारे जनतेचे मनोबल उंचावले; झारखंडच्या उपायुक्त राजेश्वरी बी. यांचा अभिनव उपक्रम


कोरोना काळात ज्येष्ठ नागरिक आणि निराधार, विधवा आणि गरजूंना मदत करण्यासाठी झारखंड येथील दुमका जिल्ह्याच्या उपायुक्त राजेश्वरी बी. यांनी जीवाचे रान केले. कोरोना विषाणूचा प्रसार, संसर्ग रोखण्यासाठी त्यांनी प्रभावी उपाययोजना राबविल्या. त्यामुळे दुमका जिल्हा कोरोनामुक्त होण्यास मोठी मदत मिळाली. Home delivery of food to widows; Raise public morale through online competition; Deputy Commissioner of Jharkhand Rajeshwari B. Innovative ventures

ज्येष्ठ लोकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू मिळतील, यासाठी मोठे प्रयत्न त्यांनी केले. ८० वर्षीय लक्ष्मी देवी, ही निराधार विधवा संधिवाताने ग्रस्त होती. उदरनिर्वाहासाठी त्यांच्याकडे रोख रक्कम नव्हती. घरी अन्न नव्हते. तिच्या नातेवाईकांचा फोन आल्यानंतर राजेश्वरी या त्या विधवेच्या मदतीसाठी पुढे धावल्या. त्यांनी एका तासाच्या आत भोजन त्यांच्या घरी पाठवले. या व अशा संकटात सापडलेल्या अनेक निराधारांना त्यांनी वेळेवर मदत करून मानव धर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे कृतीतून दाखवून दिले.

 

शहरातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून त्यांनी सर्व नियमांचे पालन नागरिक करत आहेत का ? याची काटेकोर पाहणी करून खात्री देखील करून घेतली. दुमका येथील गांधी मैदानावरील भाजी मार्केट येथे कोरोना नियम पाळण्याचे आवाहन जनतेला वारंवार केले. मास्क वापरा, सामाजिक अंतरांचे नियम पाळा आणि अन्य सुरक्षा उपायाचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच त्या लागू करण्यावर भर दिला. विशेष म्हणजे ड्रोन वापरून बाजाराचे निरीक्षण केले. पाहता पाहता जिल्हा कोरोनामुक्त होण्यास बळ मिळाले. त्याचे सर्व श्रेय हे राजेश्वरी बी. यांनाच द्यावे लागेल.

ऑनलाइन स्पर्धाद्वारे महिलांचे मनोबल वाढले

घरी -दारी जनतेला कोरोनाचे भय जनतेला वाटत असताना त्या भया पासून मुक्त करण्याचा आणि जनतेचे विशेषतः महिला आणि तरुणींचे मनोबल वाढविण्याचा विडा त्यांनी उचलला. प्रत्यक्ष हा उपक्रम त्यांनी प्रभावीपणे सुद्धा राबविला.

घरी असताना स्वयंपाक, फॅन्सी ड्रेस, मेहंदी इत्यादी ऑनलाइन स्पर्धा आयोजित केल्या. घरातून सोशल मीडियाचा प्रभावी वापर त्यासाठी केला. त्यांच्या या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम झाला. या उपक्रमाचे मोठे कौतुक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील केले.

Home delivery of food to widows; Raise public morale through online competition; Deputy Commissioner of Jharkhand Rajeshwari B. Innovative ventures

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात