विशेष प्रतिनिधी
लखनौ: राजकीय नेता असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही एखाद्याला लुटू शकत किंवा फॉर्च्यूनरखाली चिरडू शकता अशा कानपिचक्या देत पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या वागण्याने लोकांचा विश्वास जिंकण्याचे आवाहन उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी केले.Being a political leader does not mean you can rob people or crush them under fortune, Uttar Pradesh BJP president urges party workers to win people’s trust
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषला गेल्या आठवड्यात लखीमपूर खेरी हिंसाचारादरम्यान चार शेतकऱ्यांवर फॉरचूनर गाडी घातल्याच्या आरोपाखाली शनिवारी अटक करण्यात आली.
3 ऑक्टोबर रोजी यूपीच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर चार शेतकऱ्यांसह आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या भेटीचा निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांना कथितरीत्या भाजपच्या कार्यकर्त्यांपैकी एकाच्या वाहनाखाली चिरडण्यात आले.
या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या बैठकीत बोलताना सिंह म्हणाले, “आम्ही राजकारणात लोकांना लुटण्यासाठी आलो नाही, किंवा फॉर्च्यूनर (एसयूव्ही) च्या खाली कुणाला चिरडण्यासाठी आलो नाही.
तुम्हाला तुमच्या वागण्याने मते मिळतील. जर तुमच्या परिसरातील दहा लोक तुमची स्तुती करत असतील तर माझी छाती अभिमानाने फुगेल. तुमचे वर्तन असे नसावे की लोक तुम्हाला पाहून तोंड दुसरीकडे वळवतील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App