जिंदगी ना मिलेगी दोबारा सिनेमामुळे स्पेनच्या टुरिझम व्यवसायात झाली होती 32% नी वाढ ?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : रोड ट्रिप्स आणि बॉलीवूड सिनेमाचं एक जुनं नातं आहे. दिल चाहता है या सिनेमा पासून रोड ट्रिप मुव्ही बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला. त्यानंतर झोया अख्तरने जिंदगी ना मिलेगी दोबारा हा सिनेमा बनवला. या सिनेमामध्ये रितिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कॅटरिना कैफ, कल्की कोचेन, नसरुद्दीन शहा इतकी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली होती.

Zindagi Na Milegi Dobara Cinema boosted Spain’s tourism business by 32%?

२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. या तुफान हिट झालेल्या सिनेमा मधील गाणी देखील लोकांना प्रचंड आवडली होती. दुग्ध शर्करेचा योग म्हणजे जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या कविता. या सर्व सिनेमाच्या पॉझिटिव्ह बाजूंसोबत आणखी एक पॉझिटिव्ह बाजू या सिनेमाची होती ती अशी की, या सिनेमाचे शूटिंग स्पेनमध्ये झाले हाेते. Lloret de Mar beach, Alajar (Alájar) town, Bunol, Andulacia या प्रसिद्ध ठिकाणी या सिनेमाचे शुटिंग करण्यात आले हाेते.


स्त्री दिग्दर्शक! फिल्म मेकिंग फक्त पुरुषांच क्षेत्र नाहीये, ह्या स्त्री दिग्दर्शकांनी हे केलंय सिद्ध


तर मूळ मुद्द्याची गोष्ट ही की, या सिनेमाच्या तुफान यशानंतर स्पेनच्या टुरिझम व्यवसायामध्ये 32% टक्क्यांनी वाढ झाली होती. हो! आश्चर्य वाटलं ना तुम्हाला? पण ही गोष्ट खरी आहे. स्पेनमध्ये शुटींग झाल्यामुळे आणि इतके सुंदर सुंदर कलाकार या सिनेमामध्ये असल्यामुळे या मूव्हीचा लूक एकदम खतरनाक झाला होता. आणि म्हणूनच की काय स्पेनच्या टुरिझम व्यवसायामध्ये अशी वाढ झाली होती.

Zindagi Na Milegi Dobara Cinema boosted Spain’s tourism business by 32%?

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय