सिरीयस मेन या सिनेमासाठी नवाजुद्दीन सिद्दिकीला मिळाले मानाच्या आंतरराष्ट्रीय इमी अवॉर्डचे नॉमिनेशन


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनू जोसेफ यांच्या कादंबरीवर आधारित नेटफ्लिक्सवर 2020 मध्ये ‘सीरियस मेन’ नावाचा एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमामध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीने लीड कॅरेक्टर प्ले केले होते. या सिनेमामध्ये नवाजुद्दीननं एका दलित माणसाचा रोल प्ले केला होता. जो सहाय्यकाचे काम करत असतो. ज्याला एक लहान मुलगा असतो. आपल्या मुलाने खूप हुशार बनावं अशी त्यांची इच्छा असते. त्यासाठी तो काहीही करण्यास तयार असतो. काहीसा असा या सिनेमाचा प्लॉट आहे.

Nawazuddin Siddiqui receives prestigious International Emmy Award nomination for Serious Men

तर नेमकी मुद्द्याची गोष्ट ही आहे की, या सिनेमासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला बेस्ट ऍक्टर कॅटेगरीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाच्या इमी अवॉर्ड्सचे नॉमिनेशन मिळाले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीसाठी हे एक गोड सरप्राईज नक्कीच आहे. या कॅटेगरीमधून क्रिस्टिना तपन, डेव्हिड टेनंट, रॉय निक या कलाकारांनाही नॉमिनेशन मिळाले आहे. आता हा अवॉर्ड कोणाला मिळतो हे पाहणे एक्सायटिंग असणार आहे.


Emmy Awards 2021 : सुश्मिता सेनचा ‘आर्या’ बेस्ट ड्रामा सिरीजसाठी नॉमिनेट, अभिनेत्रीने शेअर केली खुशखबर


या नॉमिनेशन्सची घोषणा झाल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी प्रचंड खूश आहे. सुधीर मिश्रा या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीला सुधीर मिश्रा यांच्यासोबत काम करायचेच होते आणि सीरियस मेन ही त्यांच्यासाठी एक बेस्ट अपॉर्च्युनिटी होती. त्यामुळे या सिनेमाची ऑफर नवाजुद्दीनला दिल्यानंतर त्यांने लगेच होकार कळवला होता.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील इमी अवॉर्ड्सचे नॉमिनेशन मिळणे ही त्याच्यासाठी पहिली गोष्ट नाहीये. याआधी त्याच्या मॅक माफिया या ब्रिटिश सीरिजला बेस्ट ड्रामा सीरिजचा इमी अवॉर्ड मिळाला होता.

Nawazuddin Siddiqui receives prestigious International Emmy Award nomination for Serious Men

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात