लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपींना अटक का करत नाही?, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – लखीमपूर खेरी येथील हिंसाचारानंतर उत्तरप्रदेश सरकारने केलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करताना ज्या आरोपींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे त्यांना अद्याप अटक का केली नाही? असा सवाल केला.Why didn’t arrest peoples in Lakhimpur case

सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ म्हणाले की, ‘‘ राज्य सरकार नेमका काय संदेश देऊ पाहात आहे. याप्रकरणातील पुरावे आणि अन्य बाबी नष्ट करण्यात आलेल्या नाहीत ना याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घ्या.अन्य आरोपींना देखील तुम्ही अशीच वागणूक द्याल का? असा सवाल करतानाच न्यायालयाने हे आरोप अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले. आता याप्रकरणाची सुनावणी २० ऑक्टोबर रोजी होईल.

या शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगाने ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने केलेल्या चुकीच्या ट्विटला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी तीव्र आक्षेप घेतला. संबंधित वृत्तवाहिनीच्याविरोधात कायदेशीर कारवाई करता येवू शकते

पण न्यायालयानेच त्याकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला आहे.सरन्यायाधीश हे उदार असल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. असेही न्यायालयाने नमूद केले.

Why didn’t arrest peoples in Lakhimpur case

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती