वसुली म्हटल्यावर सरकारचा ‘ससा’, शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’; मदत तर त्याहून संतापजनक, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt On farmers Help Issue

Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt : राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने दिलासा देण्याची घोषणा केली होती. यानुसार राज्य सरकारने मदत जाहीरही केली आहे. परंतु उशिरा जाहीर झालेल्या या तुटपुंज्या मदतीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. वसुली आली की सरकारचा ‘ससा’ होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt On farmers Help Issue


प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने दिलासा देण्याची घोषणा केली होती. यानुसार राज्य सरकारने मदत जाहीरही केली आहे. परंतु उशिरा जाहीर झालेल्या या तुटपुंज्या मदतीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. वसुली आली की सरकारचा ‘ससा’ होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मराठवाड्यातील बाधित शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा

फडणवीस म्हणाले की, या सरकारमध्ये चाललेय तरी काय? विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा आहे… वसुली आली की या सरकारचा ‘ससा’ होतो आणि शेतकर्‍यांना मदत म्हटली की, ‘कासव’!️ मार्च, एप्रिल, मे 2021 मध्ये अतिवृष्टी झाली तर मदतीचा जीआर 6 ऑक्टोबर 2021 ला, जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली तर मदतीची प्रेसनोट 7 ऑक्टोबर 2021 रोजी. सहा-आठ महिने मदतीचे आदेश जर निघत नसतील, तर प्रत्यक्ष मदत केव्हा पोहोचणार?

एकरी 50 हजारांची मागणी करणारे आता हात का आखडता घेताहेत?

फडणवीसांनी म्हटले की, ‘वसुली’साठी धावणारे सरकार, शेतकर्‍यांच्या मदतीसाठी का असे धडपडतेय्? विदर्भ आणि मराठवाड्याच्या अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने आणि भरीव मदत जाहीर झालीच पाहिजे.
एकरी 50 हजारांची मागणी करणारे आता हात का आखडता घेताहेत?

मदतीचे आकडे तर त्याहून संतापजनक!

मार्च ते मे 2021 : संपूर्ण रत्नागिरी जिल्हा 5.10 लाख, सिंधुदुर्ग जिल्हा 24 लाख, परभणी जिल्हा 25 लाख, हिंगोली 14 लाख, नांदेड 20 लाख, उस्मानाबाद 1.74 लाख, यवतमाळ 10 लाख, नागपूर 23 लाख, वर्धा 39 लाख, गोंदिया 26 लाख, चंद्रपूर 35 लाख रुपये फक्त

‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘महाविकास’ नेते आता बंद पुकारतील काय?

जुलै 2021च्या मदतीची भरघोस घोषणा : नागपूर विभागातील 6 जिल्हे मिळून फक्त 10 कोटी रूपये आणि संपूर्ण नाशिक विभागातील सर्व 5 जिल्हे मिळून फक्त 1 लाख रूपये! म्हणजे एक जिल्हा फक्त 20 हजार रुपये!

राज्य शासनाने किती केली मदत जाहीर?

अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसामुळेही राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. खरिपातीलच नाही तर मार्च, एप्रिल व मे यादरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले होते. गत महिन्यात झालेल्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे सुरूच आहेत. पण मार्च, एप्रिल व मेदरम्यान झालेल्या नुकसानभरपाईसाठी 122 कोटी 26 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून तो वितरीत करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना देण्यात आलेल्या आहेत.

Devendra Fadnavis Criticizes Thackeray Govt On farmers Help Issue

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण