दुर्गा सन्मान : अ‍ॅड. कल्पलता पाटील-भारस्वाडकर… महिला व मुलांच्या मूलभूत अधिकारांची धगधगती मशाल!

 

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद – भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार, महिला आणि मुलांचे अधिकार या विषयावर विशेष अभ्यासातून अथॉरिटी आलेल्या एडवोकेट कायदा क्षेत्रातले एक महत्वाचे व्यक्तिमत्व आहे. द फोकस इंडियाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पहिल्या दुर्गा सन्मान पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. about Advocate Dr. Kalpalata Patil Bharaswadkar

त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य पीठ आणि औरंगाबाद नागपूर खंडपीठाच्या खंडपीठात वकिली तर करतातच पण महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल, मुंबई आणि औरंगाबाद तसेच सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल, मुंबई याच्या गेले 29 वर्ष सदस्य आहेत.

21 ऑगस्ट 1990 पासून ते आजतागायत मा. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी पाच हजार पेक्षा अधिक केसेस लढवल्या आहेत. यामध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क, प्राप्तिकर लवाद, या खटल्यांचा समावेश आहे. माननीय उच्च न्यायालयाने मध्यस्थ म्हणून सोपवलेल्या अनेक खटल्यांची यशस्वी कामगिरी त्यांच्या नावावर आहे.

मा. कल्पलता पाटील भारस्वाडकर या सेंट्रल बोर्ड फिक्स साइज अन्ड कस्टम्सच्या सीनियर स्टॅंडिंग कौन्सल त्याचबरोबर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्याही सीनियर स्टॅंडिंग कौन्सल आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अ दर्जाच्या पॅनेल कौन्सल मध्ये त्यांचा सहभाग होता.

वैद्यकीय क्षेत्रात मा. उच्च न्यायालयाने त्यांची मध्यस्थ म्हणून अनेकदा नेमणूक केली आहे. अनेक गुंतागुंतीच्या आणि जटील केसेस त्यांनी आपल्या कायद्याच्या अचूक ज्ञानाच्या आधारे सोडविल्या आहेत. उत्तमरित्या मार्गी लावल्या आहेत. गोदावरी मराठवाडा एरिगेशन डिपार्टमेंट, विविध महापालिका, जिल्हा परिषदा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्यासाठी पॅनल एडवोकेट म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात एमपीएससी, सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र अर्थात सिडको हायकोर्ट लीगल सर्विसेस सब कमिटी, औरंगाबाद महाराष्ट्र स्टेट फार्मिंग कॉर्पोरेशन यांच्या त्या एडवोकेट कौन्सलच्या सदस्य आहेत.

मराठवाड्याच्या सामाजिक क्षेत्रातही आघाडीवर राहून त्या कार्यरत आहेत. मराठवाडा लिगल अन्ङ जनरल एज्युकेशन सोसायटीच्या एम.पी. लॉ कॉलेज आणि महिला महाविद्यालय औरंगाबाद याच्या त्या सचिव आहेत. याखेरीज करंट क्रिमिनल रिपोर्ट, सिव्हिल लॉ टाइम्स याच्या त्या सन्माननीय संपादिका राहिल्या आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एल एम अर्थात कायदेविषयक पदव्युत्तर विभागात त्या फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत. मा. उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या सन 2000-2001 या कालावधीत त्या उपाध्यक्ष होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या त्या सिनेट मेंबर आहेत. स्वामी विवेकानंद श्रद्धा शांती समारोह समितीच्या सदस्य आहेत.

अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय कायदेविषयक परिषदांमध्ये त्यांनी आपले संशोधन निबंध वाचले आहेत. मुलांच्या शैक्षणिक मुलांच्या लैंगिक अपराध विरोधातील कायद्याच्या विषयीची अनेक प्रबोधन शिबिरे त्यांनी आयोजित केली आहेत. यातून मुलांच्या अधिकाराविषयी जी जागृती आली त्याचे श्रेय़ नक्कीच एडवोकेट डॉ. कल्पलता पाटील भारस्वाडकर यांच्या सारख्या कायद्याच्या विदूषीकडे जाते. दूरचित्रवाणीवरील कायदेविषयक विविध कार्यक्रमांमध्ये तसेच आकाशवाणीच्या कायदा सल्ला मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये त्यांचा उल्लेखनीय सहभाग राहिलेला आहे.

about Advocate Dr. Kalpalata Patil Bharaswadkar