विशेष प्रतिनिधी
पंचकुला – डेरा प्रबंधन समितीचे सदस्य असलेल्या रणजितसिंह यांच्या हत्ये प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने डेराप्रमुख गुरमित राम रहीम याच्यासहित पाच आरोपींना दोषी ठरविले. सर्वांना १२ ऑक्टोबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. Gurumeet Ram Rahim convicted
गुरमित राम रहीम आणि कृष्णकुमार या दोघांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते, तर इतर आरोपी अवतार, जसवीर आणि सबदिल हे न्यायालयात उपस्थित होते. डेसा प्रबंधन समितीचे सदस्य असलेले रणजितसिंह यांची हत्या १० जुलै २००२ रोजी झाली होती.
त्यानंतर झालेल्या पोलिस तपासाबाबत नाराजी व्यक्त करत रणजितसिंह यांच्या वडिलांनी जानेवारी २००३मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआयकडे तपास देण्याची मागणी केली होती. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App