Maharashtra : 12 लाख रुपयांत विशेष परीक्षा केंद्र; महिलेचा ऑडिओ व्हायरल; इंजिनिअरिंग प्रवेश प्रकरण, सीईटीची सायबर सेलकडे तक्रार

Maharashtra

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Maharashtra इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या एका विद्यार्थ्याला एका महिलेने १२ लाख रुपयांच्या मोबदल्यात ‘विशेष’ परीक्षा केंद्र देऊ केल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सीईटी सेलने पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र, अनेक विद्यार्थी, पालक आणि विरोधी पक्ष काँग्रेसने अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठीच्या महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षेच्या (एमएच-सीईटी) विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.Maharashtra

परभणी जिल्ह्यातील पालक तसेच दिनेशकुमार गुप्ता नावाच्या शिक्षकाचे म्हणणे आहे की, बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळवू शकले नाहीत त्यांना एमएच-सीईटीमध्ये अपवादात्मकपणे उच्च गुण मिळवणे सामान्यतः कठीण जाते. तरीही सुमारे २०० विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत ३८ ते ४० टक्के पण एमएच-सीईटीमध्ये जवळपास १०० टक्के मिळाले आहेत. याची चौकशी होणे आवश्यक आहे.Maharashtra



परीक्षा केंद्र निवडण्याचा अधिकार विद्यार्थ्याला नाही : दिलीप सरदेसाई

राज्य सीईटी सेलचे आयुक्त आणि सीईओ दिलीप सरदेसाई यांनी सांगितले की, १. परीक्षेच्या एक आठवडा आधी, विद्यार्थ्यांना फक्त ते कोणत्या शहरातून/गावातून परीक्षा देणार आहेत, याची माहिती दिली जाते.

२. परीक्षा केंद्र निवडण्याचा अंतिम अधिकार कोणत्याही विद्यार्थ्याला नसतो. संगणकीकृत प्रक्रियेद्वारे त्याचे वाटप केले जाते.

३. बोर्ड परीक्षेत कमी व एमएच सीईटीमध्ये काही विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंटाईल मिळाले यात काही चुकीचे आहे, असा निष्कर्ष आम्ही काढू शकत नाहीत.

४. राज्यात ४.६३ लाख विद्यार्थ्यांनी एमएच सीईटी दिली. त्यापैकी २.३५ लाखच केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (CAP) आले होते.

काँग्रेस प्रवक्त्याचा भाजप नगरसेवकावर आरोप

काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रवक्ते बालाजी गाडे म्हणाले की, नांदेडमधील एका भाजप नगरसेवकाच्या मुला-मुलीला जेईई परीक्षेत भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र-गणित गटात अनुक्रमे ५६ टक्के व ५१ टक्के तर एमएच सीईटीमध्ये ९९ पर्सेंटाईल मिळाले. त्यांना प्रश्नपत्रिका आधीच मिळाली होती का?

काय आहे क्लिपमध्ये

एक महिला एका अज्ञात पालकाला जवळपास १२ लाख रुपयांच्या मोबदल्यात ‘विशेष’ परीक्षा केंद्र देऊ करत असल्याचे ऐकू येते. या केंद्रामुळे विद्यार्थ्याला अतिशय उच्च पर्सेंटाइल मिळतील. त्याला नामांकित सरकारी अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळण्यास मदत होईल, असा दावा ती करत आहे.

Maharashtra CET Cell Files Cyber Complaint Over Viral Audio Promising Engineering Exam Center for ₹12 Lakh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात