अरे तू आमदार आहेस, तू तरी मास्क वापर, अजित पवार यांनी रोहित पवार यांचे कान उपटले


बारामती येथील कार्यक्रमात वडील राजेंद्र पवार यांना सुनावल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलगा रोहित पवार यांचेही चांगलेच कान उपटले. मास्क घालत नसल्यावरून त्यांनी रोहित पवार यांना खडे बोल सुनावले.You are a MLA, you use a mask, Ajit Pawar slaped Rohit Pawar


विशेष प्रतिनिधी

बारामती : बारामती येथील कार्यक्रमात वडील राजेंद्र पवार यांना सुनावल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलगा रोहित पवार यांचेही चांगलेच कान उपटले. मास्क घालत नसल्यावरून त्यांनी रोहित पवार यांना खडे बोल सुनावले.

पवार म्हणाले, काल कर्जत – जामखेडला गेलो होतो. तिकडे कोणीही मास्क वापरत नाहीत. मी रोहितला म्हटले, अरे शहाण्या तू आमदार आहेस. तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल, अशा शब्दांत  आमदार रोहित पवार यांचे कान धरले. ते म्हणाले, मी भाषण करताना मास्क काढत नाही अन् काही जण मास्कच वापरत नाहीत. हे बरोबर नाही. कोरोना कमी झाला असला तरी दक्षता घेण्याची गरज आहे.

सकाळी लवकर कामाला सुरुवात केली, तर कामे लवकर होतात. काही जण दादा सेल्फी, दादा फोटो म्हणत मागे लागतात. त्यांना नाही म्हणावे तर उपमुख्यमंत्री झाला, साधा सेल्फी काढून देईना. याची बटने दाबून दाबून आम्ही मेलो इतके दिवस. असे म्हटले जाते. म्हणून आपले गप्प बसायचे अन् पहाटे जेवढे काही उरकता येईल तेवढे उरकून घ्यायचा प्रयत्न करायचा.


अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आली का?


पवार म्हणाले, कुठेही तुटेपर्यंत ताणायचे नसते. तेसुद्धा समाधानी झाले पाहिजेत. प्रवासीसुद्धा समाधानी झाले पाहिजेत. तसेच सरकार म्हणून आम्हालादेखील निर्णय घेता आला पाहिजे.  त्रिपुरा येथे झालेल्या जातीय दंगलीचे पडसाद राज्यातील काही शहरांमध्ये उमटले. मात्र, अशा वेळी संयम ठेवून जातीय सलोखा वाढवला पाहिजे. पोलीस दलाला मदत करून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा.

You are a MLA, you use a mask, Ajit Pawar slaped Rohit Pawar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात