वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात शनिवारी ४० हजार २९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. नवीन २६ हजार १३३ रुग्णांची नोंद झाली. बाधितांची एकूण संख्या ५५ लाख ५३ हजार २२५ तर, मृतांचा आकडा ८७ हजार ३०० आहे. आतापर्यंत ५१ लाख ११ हजार ९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. More Than 40,000 people Recoverd from Corona in the state; The patient’s recovery rate is over 90%
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.४ टक्क्यांवर आले आहे, तर सध्या ३ लाख ५२ हजार २४७ रुग्ण उपचार घेत आहेत. राज्याचा मृत्युदर १.५७ टक्के आहे. आजपर्यंत तपासलेल्या ३ कोटी २७ लाख २३ हजार ३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.९७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २७ लाख ५५ हजार ७२९ व्यक्ती होम क्वाॅरंटाइनमध्ये आहेत, तर २२ हजार १०३ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या ६८२ मृत्यूंपैकी ३९२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर २९० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App