ED action : ईडीने 13 कोटींची मालमत्ता जप्त केल्याबरोबर राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे नॉट रिचेबल!!


प्रतिनिधी

अहमदनगर : अनिल देशमुख, नवाब मलिकांपाठोपाठ राष्ट्रवादीचे तिसरे मंत्री प्राजक्त तनपुरे ईडीच्या कचाट्यात सापडले. त्यांची 13 कोटींची मालमत्ता जप्त केली. त्याचबरोबर ईडीने आपल्यावर पुढची अटकेची कारवाई करू नये यासाठी प्राजक्त तनपुरे नॉट रिचेबल झाले आहेत. ED action: ED confiscates assets worth Rs 13 crore, NCP Minister Prajakt Tanpure not recoverable !!

ईडीची कारवाई सुरू झाल्याबरोबर पूर्वी अनिल देशमुख हे असेच नॉट रिचेबल झाले होते. अनेक दिवस ते नेमके कुठे आहेत, याचा कुणालाही पत्ता नव्हता. ईडीने अनिल देशमुख यांच्या घरांवर अनेकदा छापे घातले. त्यावेळी त्यांचे कुटुंबीय हजर असायचे. परंतु, अनिल देशमुख एकदाही तेथे नव्हते. त्यामुळे अनिल देशमुख नेमके कुठे आहेत याचा कोणालाही पत्ता लागलेला नव्हता. नंतर अनिल देशमुख ईडीला समोर शरण गेले.

प्राजक्त तनपुरे हे मंत्री देखील असेच नॉट रिचेबल झाले आहेत.

राष्ट्रवादीचे दुसरे आघाडीचे तिसरे मंत्री

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या अधिकाऱ्यांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकीकडे तोंडी तोफा डागत असताना दुसरीकडे ईडीची कायदेशीर कारवाई मात्र थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख दुसरे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. असे असताना राष्ट्रवादीच्या तिसऱ्या मंत्र्यावर ईडीने कायदेशीर कारवाई केली.

ठाकरे – पवार सरकारमधील 12 हून अधिक मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यापैकी आता राष्ट्रवादीचा तिसरा मंत्री ईडीच्या निशाण्यावर असल्याचे समोर आले आहे.



तनपुरे यांच्यावर ईडीने केली कारवाई

राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीने कारवाई केली असून राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास 13 कोटी 41 लाख आहे. ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या दोन जमिनीही जप्त केल्या आहेत. त्या जमिनींची किंमत जवळपास 7 कोटी 60 लाख इतकी आहे.

 काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनाही फटका

प्राजक्त तनपुरे यांच्या कारखान्यावरील मालमत्ता जप्तीच्या कारवाईचा फटका काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनाही बसला आहे. राम गणेश गडकरी साखर कारखान्याची नागपूरमधली 90 एकर जमीन काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या तक्षशिला सिक्युरिटीजने खरेदी केली असून अहमदनगरमधील 4 एकर जमीनीचा समावेश आहे. ईडीने ही संपत्तीसुद्धा जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक यांच्या लिलावात एक साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप आहे. ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्याबाबत चौकशी सुरू केली होती. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबरमध्ये तनपुरे यांचा जबाब नोंदवण्यात आला. हा तपास सुरू असताना आता ईडीने तनपुरे यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई करत मालमत्ता जप्त केली आहे.

ED action: ED confiscates assets worth Rs 13 crore, NCP Minister Prajakt Tanpure not recoverable !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात