पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले रोमानियाच्या पंतप्रधानांचे आभार


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोमानियाचे प्रंतप्रधान निकोले सिउका यांच्यासोबत फोनवर संपर्क साधून त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले आहे. रोमानियाने भारतीयांना व्हिसा आणि परवानगी नसताना प्रवेश दिला आहे. भारतातून गेलेल्या विशेष निर्वासन विमानांच्या उड्डाणांना परवानगी दिल्यामुळे आभार मानले.Prime Minister Narendra Modi thanked the Prime Minister of Romania

अनेक भारतीय युक्रेनच्या सीमेवर दाखल झाले असून त्यांना तेथून भारतात आणण्याचं काम चालू आहे. या कामात रोमानियाने मदतीचा हात पुढे केला आहे. नरेंद्र मोदी यांनी सिऊका यांना फोन करून त्यांचे आभार मानले. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने पुढील काही दिवसांत नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहेआणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे विशेष दूत म्हणून नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनाही तैनात करण्यात येणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सिउका यांना सांगितले.रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरु असून रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले सुरु आहेत.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारताकडून प्रयत्न सुरु आहेत. काही भारतीयांना मायदेशात आणण्यात भारताला यश आले असून अजून बरेच भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत.
स्लोव्हाक देशाचे राष्ट्राध्यक्ष एडवर्ड हेगर यांनाही फोन करुन मोदींनी त्यांचे आभार मानले.

त्याचबरोबर त्यांच्याकडे पुढील काही दिवसांच्या मदतीसाठी अपेक्षा व्यक्त केली. तसेच भारतीय नागरिकांच्या स्थलांतरणावर नियंत्रम ठेवण्यासाठी न्याय मंत्री किरेन रिजिजू यांना तैनात करणार असल्याची माहीती त्यांनी हेगर यांना दिली. पंतप्रधान मोदींनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या हिंसाचार आणि मानवतावादी संकटाबद्दल दु:ख व्यक्त केले.

Prime Minister Narendra Modi thanked the Prime Minister of Romania

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी