कायदा झाल्यापासून तिहेरी तलाकच्या प्रकारांत ८० टक्यांनी घट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तिहेरी तलाक ही दुष्ट सामाजिक रूढी आहे. देशात तिहेरी तलाकविरोधात सप्टेंबर २०१९ मध्ये कायदा झाल्यापासून या प्रकारांत मोठी घट झाली आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.आपल्या मासिक मन की बात कार्यक्रमात मोदी म्हणाले की, तिहेरी तलाकसारख्या दुष्ट रूढी आता नष्ट होत चालल्या आहेत.According to Prime Minister Narendra Modi, the number of triple divorces has decreased by 80% since the enactment of the law

जेव्हापासून तिहेरी तलाकविरोधात कायदा केला, तेव्हापासून हे प्रकार ८० टक्क्यांनी कमी झाले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाच्या आघाडीवर हे सरकारचे यश आहे.पंतप्रधान म्हणाले, अलीकडील काही काळात सरकारने मातृत्वाची रजा वाढविण्यासारखे निर्णय घेतले आहेत.



विवाहासाठीचे किमान वय मुला-मुलींसाठी एकच असावे यासाठी देशात प्रयत्न सुरू असून पुत्र आणि कन्यांना एकसमान अधिकार देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे महिलांचे प्रत्येक क्षेत्रातील योगदान वाढत चालले आहे. सामाजिक मोहिमांचा परिणाम म्हणून आणखी एक मोठा बदल देशात होत आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओचे यश लक्षात घ्या.

आज देशात मुली आणि मुलांच्या जन्माच्या गुणोत्तरात सुधारणा होत आहे. याच वेळी आपल्या कन्या शाळा सोडणार नाहीत, हे पाहण्याची जबाबदारीही आपल्यावर आहे. स्वच्छ भारत अभियानामुळे उघडय़ावर शौचाला बसण्याची वेळ आता येत नाही. हे सर्व कमी कालावधीत साध्य करता आले, कारण या बदलाच्या प्रागतिक मोहिमा राबविण्यासाठी महिला स्वत:हून पुढे येत आहेत.

भारतातील प्राचीन शिल्पे, मूतीर्ची परदेशात तस्करी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले, हा भारताचा सांस्कृतिक ठेवा मायभूमीत परत आणणे हे आपले कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. २०१३ पर्यंत अशा १३ मूर्ती भारतात आणल्या गेल्या, तर गेल्या सात वर्षांत अशा अमूल्य २०० मूर्ती यशस्वीपणे परत आणल्याची माहिती त्यांनी दिली. भारताची भावना लक्षात घेता अमेरिका, ब्रिटन, हॉलंड आदी अनेक देशांनी यासाठी भारताला मदत केली.

According to Prime Minister Narendra Modi, the number of triple divorces has decreased by 80% since the enactment of the law

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात