पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिष्टाई यशस्वी, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेचे पुतीन यांनी दिले आश्वासन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिष्टाई यशस्वी झाली आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादीमिर पुतीन यांनी रशियाच्या सुरक्षा दलाला भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत सूचना दिल्या आहेत. यानंतरच भारतीय दुतावासाने युक्रेनमधील भारतीयांना सुरक्षित ठिकाणी जाताना वाहनांवर भारताचा तिरंगा ध्वज लावण्याच्या सूचना दिल्या आहे.Putin assured the safety of Indians stranded in Ukraine

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचं यात मोठं प्रमाण आहे. याच पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमधील भारतीयांच्या सुरक्षेबाबत भारताला आश्वासन दिले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुरक्षित आणणं शक्य होणार आहे.



युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना रस्त्याच्या मार्गे रोमानिया आणि हंगेरीत आणण्यात आले आहे. पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचं आश्वासन दिल्यानंतर युक्रेनच्या पश्चिम सीमेकडून भारतीयांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

युक्रेनमध्ये सध्या १६ हजार भारतीय नागरिक मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत. शुक्रवारी सायंकाळी २०० भारतीयांना युक्रेनमधून रोमानियात आणलं गेलं. २६ फेब्रुवारी रोमानियातून २१९ प्रवाशांना घेऊन पहिलं विमान मुंबईत दाखल होणार आहे. याशिवाय २ विमानं युक्रेनमधील ४९० प्रवाशांना घेऊन राजधानी दिल्लीत पोहचणार आहे.

२१९ भारतीयांना घेऊन रोमानियाहून निघालेल्या पहिल्या विमानाने मुंबईकडे घेतली भरारीयुक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्या २१९ भारतीयांना घेऊन, मुंबईला येणारे पहिले विमान रोमानियाहून निघाले आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले की, युक्रेनमधून बाहेर काढण्यात आलेल्या २१९ भारतीयांसह मुंबईला जाणारे पहिले विमान रोमानियाहून निघाले आहे.

ते म्हणाले, ह्यआम्ही प्रगती करत आहोत. आमचं पथक २४ तास कार्यरत आहे. मी वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

आता या सर्व भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या लोकाना प्रथम रस्ते मागार्ने युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवले जाईल. त्यानंतर तेथून एअर इंडियाच्या विशेष विमानांनी त्यांना भारतात परत आणले जाईल. अशी पहिली निर्वासन उड्डाणे आज रोमानिया आणि हंगेरीला पाठवण्यात आली आहेत. भारताने हंगेरी, पोलंड, स्लोव्हाक प्रजासत्ताक आणि रोमानिया यांच्याशी युक्रेनच्या सीमेवरून आपल्या नागरिकांना रस्ते मागार्ने बाहेर काढण्यासाठी चर्चा केली आहे.

Putin assured the safety of Indians stranded in Ukraine

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात