रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन ६ डिसेंबरला भारतात; पुढच्या दशकभराचे संबंध मजबूत करण्याचा अजेंडा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत – रशिया संबंध आता “पूर्वीसारखे” राहिले नाहीत, असा सूर विरोधी काँग्रेस पक्षाने आळवला असताना केंद्रातले मोदी सरकार मात्र रशियाबरोबर भारताचे संबंध पुढच्या दशकभरासाठी मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले टाकत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या सहा डिसेंबर रोजी भारत दौऱ्यावर येत असून भारत-रशिया विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाची स्थापना तसेच दोन्ही देशांदरम्यान व्यूहरचनात्मक संबंधांमध्ये भरीव वाढ हे त्यांच्या भारत भेटीचे मुख्य उद्दिष्ट आहे.Russian President Vladimir Putin in India on December 6

त्याच सुमारास भारत आणि रशिया यांचे संरक्षणमंत्री आणि परराष्ट्रमंत्री एकमेकांशी वाटाघाटींच्या फेर्‍या करणार आहेत. यामध्ये संरक्षण संबंध तसेच आंतरराष्ट्रीय संबंध या विषयांवर भारत रशिया यांचे सहकार्य यावर भर असणार आहे. भारत आणि रशिया संरक्षण क्षेत्रात एकत्रित कोणत्या पद्धतीने काम करू शकतात तसेच विविध आंतरराष्ट्रीय फोरमवर कोणत्या प्रकारचे सहकार्य वृद्धिंगत होऊ शकते यावर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शुईग आणि परराष्ट्रमंत्री सर्गेई लारोव्ह यांच्याशी चर्चा करतील.


पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत open debate; रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकेन यांच्यासह अनेक राष्ट्रप्रमुख सहभागी होणार


अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शिखर बैठक होईल. यामध्ये दोन्ही देशांच्या संरक्षण आणि परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या वाटाघाटीतवर शिक्कामोर्तब होईल. पुढच्या दशकभरासाठी भारत-रशिया संबंधांची मजबूत पायाभरणी या शिखर बैठकीतून होणे अपेक्षित आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात अजेंडा निश्चित केला आहे.

– मणिशंकर टीकास्त्र

भारत आणि रशिया यांचे संबंध पूर्वीसारखे राहिले नाहीत, असे टीकास्त्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी नुकतेच सोडले होते. भारत अमेरिकेच्या कच्छपी लागला आहे. त्यामुळे रशियाशी संबंध दुरावले आहेत, असा दावा त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भारत भेट होत आहे. तसेच दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांची संयुक्त बैठक देखील होत आहे याला विशेष महत्त्व आहे.

Russian President Vladimir Putin in India on December 6

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात