Maratha reservation : संभाजीराजेंना उपोषण करायला लागणे हा काळा दिवस, शिवसेना खासदार धैर्यशील माने यांचा ठाकरे – पवार सरकारला घरचा आहेर


 प्रतिनिधी

मुंबई – छत्रपती घराण्याच्या तलवारीची ख्याती आहे. पण आज या राजघराण्याला समाजाच्या मागण्यासाठी उपोषण करावे लागतेय. खासदार संभाजीराजेंना उपोषण करावे लागले हा माझा आयुष्यातील काळा दिवस आहे, अशा तिखट शब्दांत शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी आज महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारला घरचा आहेर दिला आहे. मराठा समाजाचे आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार संभाजीराजे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी धैर्यशील माने त्या ठिकाणी पोहोचले. संभाजीराजेंना उपोषणस्थळी जाऊन पाठिंबा देणारे धैर्यशील माने हे शिवसेनेचे पहिले खासदार आहेत. Maratha reservation : shivsena MP dhairyasheel mane supports MP Sambhaji Raje fast agitation

खासदार धैर्यशील माने म्हणाले की, माझे राजे उपाशी असताना मी घरात कसा बसेन? मी इथे छत्रपतींचा मावळा म्हणून आलो आहे. दिल्लीमध्ये आम्ही राजेंच्या सोबत लढतो आहोतच. आज मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राजघराण्याला उपोषणासाठी बसावे लागते आहे, हा माझ्या आयुष्यातील काळा दिवस आहे.



महाविकास आघाडी सरकारच्या या संदर्भात बैठका सुरू आहेत. काहीही करून आजचा दिवस उलटता कामा नये. मी या संबंधी मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाने मांडणार असून यावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा आशावाद खासदार माने यांनी व्यक्त केला.

मात्र, आज सकाळीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होऊन मराठा समाजासाठी विशेष मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय झाला. मात्र खासदार संभाजीराजे यांना हा निर्णय मान्य नाही. मराठा आरक्षणाचे एक याचिकाकर्ते विनोद पाटील यांनाही ठाकरे – पवार सरकारचा हा निर्णय मान्य नाही.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी खासदार संभाजीराजे यांना उपोषण स्थळी जाऊन पाठिंबा देणे आणि संभाजीराजेंना उपोषण करावे लागणे हा काळा दिवस आहे, असे म्हणणे याला राजकीय महत्त्व आहे.

 Maratha reservation : shivsena MP dhairyasheel mane supports MP Sambhaji Raje fast agitation

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात