ED action : देशमुख, मलिकांपाठोपाठ राष्ट्रवादीचे तिसरे मंत्री प्राजक्त तनपुरे ईडीच्या कचाट्यात!!; 13 कोटींची मालमत्ता जप्त!!


प्रतिनिधी

मुंबई : सक्तवसुली संचालनालय अर्थात किडीच्या अधिकाऱ्यांवर महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकीकडे तोंडी तोफा डागत असताना दुसरीकडे ईडीची कायदेशीर कारवाई मात्र थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख दुसरे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. असे असताना राष्ट्रवादीच्या तिसऱ्या मंत्र्यावर ईडीने कायदेशीर कारवाई केली आहेED action: Deshmukh, Malik’s third NCP minister Prajakt Tanpure in ED’s controversy !!; Assets worth Rs 13 crore confiscated

ठाकरे – पवार सरकारमधील 12 हून अधिक मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यापैकी आता राष्ट्रवादीचा तिसरा मंत्री ईडीच्या निशाण्यावर असल्याचे समोर आले आहे.



तनपुरे यांच्यावर ईडीने केली कारवाई

राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीने कारवाई केली असून राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास 13 कोटी 41 लाख इतकी असल्याची माहिती समोर येत आहे. ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या दोन जमिनीही जप्त केल्या आहेत. त्या जमिनींची किंमत जवळपास 7 कोटी 60 लाख इतकी आहे.

काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनाही फटका

प्राजक्त तनपुरे यांच्या कारखान्यावरील मालमत्ता जप्तीच्या कारवाईचा फटका काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनाही बसला आहे. राम गणेश गडकरी साखर कारखान्याची नागपूरमधली 90 एकर जमीन काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या तक्षशिला सिक्युरिटीजने खरेदी केली असून अहमदनगरमधील 4 एकर जमीनीचा समावेश आहे.

ईडीने ही संपत्तीसुद्धा जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक यांच्या लिलावात एक साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप आहे. ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्याबाबत चौकशी सुरू केली होती. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबरमध्ये तनपुरे यांचा जबाब नोंदवण्यात आला. हा तपास सुरू असताना आता ईडीने तनपुरे यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई करत मालमत्ता जप्त केली आहे.

ED action: Deshmukh, Malik’s third NCP minister Prajakt Tanpure in ED’s controversy !!; Assets worth Rs 13 crore confiscated

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात