औंध मधील डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह बंदच विद्यार्थ्यांची गैरसोय; तात्काळ सुरु करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख (औंध आयटीआय ) वसतीगृहाचे उद्घाटन 2018 मध्ये तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले होते. मुलांसाठी २५० आणि मुलींसाठी ५० आसन क्षमता असणारे हे वसतीगृह सध्या बंद आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह व प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यासाठी मागणी होत आहे. Aundh Punjabrao Deshmukh hostel closed Disadvantage of students; Demand of Sambhaji Brigade to start immediately

वसतीगृहात प्रवेश असणारे मागील वर्षातील विद्यार्थी वारंवार जिल्हाधिकारी व सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. परंतु वसतिगृह सुरू होत नाही. कोरोना काळातील बिकट परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील मुलांची राहण्यासाठी घर नाही आणि खायला पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झालेली असताना सुद्धा राज्य सरकारने मुलांचे वसतीगृह सुरू केले नाही. मागील काळात याच हॉस्टेल मध्ये दोन वर्ष मुलांना पिण्यासाठी पाणी नव्हते.संभाजी ब्रिगेडला ही माहिती समजल्यानंतर गरजू मुलांची भेट घेऊन दिलासा देण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, संदिप लहाने पाटील, विद्यार्थी हर्षवर्धन शिंदे, स्वप्निल चौधरी, स्वप्निल बहीर, जयेश सोनवणे, अभिषेक शिंदे आदी उपस्थित होते.

संतोष शिंदे (प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र) म्हणाले की पुण्यातील बंद केलेली सर्व वसतीगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू करावी. डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृहा मध्ये पूर्ण वेळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून मुलांना जेवणासाठी सुद्धा उत्तम प्रकारची मेस (खानावळ) त्या ठिकाणी सुरू करावी. अन्यथा ३ मार्चपासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने विद्यार्थ्यांना घेऊन औंध आयटीआय समोर उपोषण करण्यात येणार आहे.

Disadvantage of students; Demand of Sambhaji Brigade to start immediately

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था