Nawab Malik admitted in JJ hospital : ईडीच्या कोठडीत नवाब मालिकांना पोटदुखी; जे जे रुग्णालयात दाखल, उपचार सुरू


प्रतिनिधी

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन गैरव्यवहार केल्याप्रकरणी डीडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांना आज सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कोठडीतच पोटदुखी सुरू झाली. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून उपचारानंतर त्यांना पुन्हा त्या कोठडीत घेऊन चौकशी केली जाईल. नवाब मलिक यांना ईडीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देऊन एक दिवस उलटला आहे.Nawab Malik admitted in JJ hospitalईडीचे अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत परंतु नवाब मलिक हे ईडीच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीला दाद देत नाहीत. ते चौकशीला सहकार्य करत नाहीत. उलट अधिकाऱ्यांनाच धमकावत आहेत, अशा बातम्या ईडीच्या सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी दिल्या आहेत. मात्र, आज सकाळी त्यांना तपासणीसाठी अधिकाऱ्यांनी जे. जे. रुग्णालयात नेले. त्यांनी पोटदुखीची तक्रार केल्यामुळे त्यांना आता रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे.

ईडीच्या कोठडीत आपल्याला घरचे जेवण आणि औषधे घेण्याची मुभा देण्यात यावी, ही मागणी नवाब मलिक यांनी ती पीएमएलए कोर्टात केली होती. ती कोर्टाने मान्य केली. त्यानुसार त्यांना ईडीच्या कोठडीत घरचे जेवण आणि औषधे घेण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर त्यांनी पोटदुखीची तक्रार केल्यामुळे त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nawab Malik admitted in JJ hospital

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती