Nawab Malik – Shiv Sena : महाविकास आघाडीची मंत्रिपदाच्या खुर्च्यांसाठी एकी; मलिक समर्थनाच्या आंदोलनात बेकी!!


नाशिक : नवाब मलिक यांच्या समर्थनासाठी आज झालेल्या आंदोलनात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची खुर्च्यांवर बसण्यासाठी कशी एकी आहे, पण प्रत्यक्ष आंदोलनात कशी बेकी आहे हे दिसून आले…!! Nawab Malik – Shiv Sena: Maha Vikas Aghadi unites for ministerial seats; Becky in Malik support movement !!

फक्त म्हणायला ते आंदोलन महाविकास आघाडीचे होते पण मुख्यमंत्र्यांचा पक्ष असलेली शिवसेना या आंदोलनापासून दूर राहिली. कालपर्यंत नवाब मलिक यांच्या समर्थनासाठी जोर-जोरात मीडियासमोर बोलणारे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बरोबर निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशात निघून गेले. इकडे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे मंत्री आंदोलन करत होते आणि आदित्य ठाकरे – संजय राऊत हे शिवसेनेच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशात निघाले होते. आंदोलनाच्या ठिकाणी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे मंत्री आमदार – खासदार दिसायला लागल्यावर तसेच त्यांचे फोटो व्हायरल झाल्यावर शिवसेनेचे मंत्री आंदोलनाकडे फिरकले नसल्याचे माध्यमांनी सांगायला सुरुवात केली. त्यानंतर सुमारे तासाभराने शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई आंदोलनस्थळी पोहोचले. शिवसेना सुभाष देसाई यांच्या रूपाने आंदोलनात सहभागी झाल्याचे दाखविण्यात आले.



पण ठाकरे – पवार मंत्रिमंडळात एकमेकांच्या शेजारी खुर्च्यांवर बसणारे बसण्यासाठी एकी दाखवणारे महाआघाडीतल्या तीन पक्षांचे मंत्री प्रत्यक्ष आंदोलनात मात्र एकत्र दिसले नाहीत. सुभाष देसाई नुसतेच आंदोलनात आले. काही वेळ थांबले आणि निघून गेले. त्यामुळे मंत्र्यांची खुर्च्यांवर बसण्यासाठी एकी आणि प्रत्यक्ष आंदोलनात देखील बेकी हेच या निमित्ताने दिसून आले.

पण हे का घडले…??

पण हे नेमके काय घडले असावे?, याचा खुलासा महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्षांच्या राजकीय ताकतीशी जोडता येईल. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन जरूर केले, पण ते मुंबई ठप्प करू शकले नाहीत. ती ताकद राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे नाही. ही ताकद शिवसेनेकडे आहे. नवाब मलिक यांच्यासारख्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थनासाठी शिवसेना आपली ताकद का पणाला लावेल…?? शिवसेनेचे बाकीचे नेते आधीच ईडीच्या स्कॅनर खाली आहे ठाकरे कुटुंबीयही ईडीचा स्कॅनर खाली येऊ शकते. अशा वेळेला शिवसेना आपली ताकद राखून ठेवेल की नवाब मलिक यांच्या साठी खर्च करेल??, याचाही विचार शिवसेनेने केला असल्यास त्यात काही गैर नाही…!!

महाविकास आघाडी सत्तेसाठी एकत्र आली आहे. एकमेकांच्या पक्ष वाढविण्यासाठी नव्हे, याची समज शिवसेना नेतृत्वाला नक्की आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने देखील हुशारीने पक्षाचे आंदोलन न करता ते मंत्र्यांचे आंदोलन केले. त्यामुळे गर्दी जमली नाही तरी मंत्री रस्त्यावर आल्याचे दिसले.

इथे जर कोणत्या शिवसेनेच्या मंत्र्याला अटक झाली असेल किंवा ठाकरे कुटुंबीयांपैकी कोणाला अटक झाली असती तर शिवसेनेने मुंबईत राडा केला असता. मुंबई ठप्प करून दाखवली असती. पण राष्ट्रवादीच्या नवाब मालिकांसाठी तसे शिवसेनेने करण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री आणि आमदार यांना आंदोलनाकडे यावेसे वाटले नसेल तर यात कोणतेही आश्चर्य नाही.

Nawab Malik – Shiv Sena: Maha Vikas Aghadi unites for ministerial seats; Becky in Malik support movement !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात