सांताक्रूझ पोलिसांनी कोरोना नियम आणि शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन आनंदोत्सव साजरा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राज्य सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी त्यांच्यावर जबरदस्तीने गुन्हा दाखल केल्याचे कंबोज यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. Mohit Kamboj, who accused Malik booked by police
विशेष प्रतिनिधी
मुंबई: सांताक्रूझ पोलिसांनी कोरोना नियम आणि शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन आनंदोत्सव साजरा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राज्य सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी त्यांच्यावर जबरदस्तीने गुन्हा दाखल केल्याचे कंबोज यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
मलिक यांनी आर्यन खान प्रकरणात माेहित कंबाेज यांच्यावर आरोप केले हाेते. कंबाेज म्हणाले, मी सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे. कोर्टातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मी यावर सविस्तर बोलू शकेन. रिमांड कॉपी हाती आल्यानंतर त्यांनी गेल्या वीस वर्षात जे जे गुन्हे केले आहेत ते समोर आणेल. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत नवाब मलिकांचे जे संबंध होते, आहेत तसेच ज्या प्रकारे त्यांच्याकडून जे आर्थिक व्यवहार झाले आहेत. यावर पुढे जशी चौकशी जाईल त्यातून भ्रष्टाचारी मलिकांचे कपडे उतरतील.
मोहित कंबोज हा समीर वानखेडेचा पार्टनर असून त्याने आर्यन खानला ट्रॅप करुन त्याचे अपहरण केले. हे प्रकरण ड्रग्जचे नाही अपहरणाचे आहे. मोहीत कंबोज अपहरणाचा मास्टर माइंड आहे. मोहीत आणि वानखेडे यांचे चांगले संबंध असून वानखेडेंच्या प्रायव्हेट पार्टीचा मोहित कंबोज हा भाग असल्याचा अाराेप नवाब मलिक यांनी केला हाेता. मोहित कंबोजवर ११०० करोड रुपयांच्या बँक अफरातफरीचे आरोप आहेत. तो आधी काँग्रेस नेत्यांच्या मागे होता. मात्र सरकार बदलल्यानंतर तो भाजपकडे आल्याचे नवाब मलिक म्हणाले हाेते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App