चंद्रकांत पाटीलांना काेल्हापूर नंतर पुण्यातील काेथरुड मतदारसंघ ही साेडावा लागेल – जयंत पाटील


महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करणे, जाणीवपूर्वक धर्माचा आधार घेऊन जातीय तणाव निर्माणाचे काम काहीजण करत आहे त्या सर्वांना काेल्हापूर पाेटनिवडणुकीतील निकालातून चपराक आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे -महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करणे, जाणीवपूर्वक धर्माचा आधार घेऊन जातीय तणाव निर्माणाचे काम काहीजण करत आहे त्या सर्वांना काेल्हापूर पाेटनिवडणुकीतील निकालातून चपराक आहे. देशात व महाराष्ट्रात काेणत्याही धर्माच्या लांगूलचालणाला महत्व नाही तर कामाला महत्व आहे. काेल्हापूरकरांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना साेडून दिले आहे.पुण्यातील काेथरुड मतदारसंघ ही त्यांना लवकरच साेडावा लागेल इतकी प्रेम, आपुलकी येथील कार्यकर्त्यांत दिसून आल्याचा टाेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केला आहे.  Bhartiya Janta party state president chandrkant patil need safe constituents in next election says NCP stater president jayant patil

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आयाेजित ‘परिवार संवाद यात्रा’ पुण्यात आली असताना ते बाेलत हाेते. सदर यात्रेचा समाराेप २३ एप्रिल राेजी काेल्हापूर येथे हाेणार आहे. पक्षातील कार्यकर्त्यांची मते या यात्रेच्या माध्यमातून जाणून घेतली जात असल्याचे सांगत पाटील म्हणाले, सर्वांचा सन्मान ठेवणे आणि सर्वांना समान न्यायाने वागवणे महत्वपूर्ण आहे. ज्या पध्दतीने जाणीवपूर्वक जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात पुढील नियाेजन असे आहे की,  राज ठाकरे एका बाजूने विषय उभा करुन आग्रह करत राहिले असून दुसऱ्या बाजूला लवकरच त्याला प्रतिवाद करण्यासाठी एमआयएमचे नेते ओवेसी यांची ही पिक्चर मध्ये एन्ट्री याप्रकरणात हाेईल. राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचा व त्यापुढे राज्यात काहीतरी अघटित करण्याचा उद्देश आहे. महाराष्ट्रातील जनतेला हळूहळू या गाेष्टी दिसून येतील.  पेट्राेल, डिझेल, गॅस, सिमेंट, स्टील याची महागाई प्रचंड वाढूनही त्याबाबतची चर्चा हाेताना दिसून येत नाही परंतु हनुमान चालिसाची चर्चा हाेते. आम्ही ही हनुमानाचे, रामाचे भक्त आहे परंतु आम्ही त्याचे कधी प्रदर्शन करत नाही. हिंदु धर्माचा अभिमान असला तरी दुसऱ्या धर्माचा द्वेष केला नाही पाहिजे. त्यामुळे जाणीवपूर्वक राजकारणासाठी देवांना वापरणे हे आम्ही कधी केलेले नाही, ज्याचा सध्या वापर सुरु आहे.



चंद्रकांत पाटीलांना पराभवाचे शल्य

ज्यावेळेस तीन पक्ष एकत्रित येतात त्यावेळी भाजपचा पराभव हाेणे फार अवघड नाही. त्यामुळे काेल्हापुरात आमचा विजय सुकर झाला. काेल्हापूर मधील विजय हा पुराेगामी पणाकडे कशाप्रकारे महाराष्ट्र झुकलेला आहे याची परिचिती देणारा आहे. शाहू-फुले-अांबेडकर यांचे नाव आम्ही उगीच घेत नाही. शाहूंनी राज्यात समतेचा विचार दिला त्या करवीरनगरीने दिलेला निकाल राज्यासाठी आर्दश आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मनात या पराभवाचे शल्य राहिल. पाेटनिवडणुकीत उभे राहण्याची त्यांना संधी हाेती परंतु ते उभे राहिले नाही. ते हिमायलयात जाणार असतील तर मी त्यांच्यासाेबत जाईल ते मी पसंद करेल.

दंगल घडविण्याचे कटकारस्थान

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ताेडण्याचे सर्व मार्ग वापरुन झाले आहे. आमदार फाेडण्याचे प्रयत्न झाले, पक्ष फाेडण्याचे प्रयत्न झाले, ईडी, आयटी, सीबीआय वापरुन झाले. त्यामुळे आता काय हा प्रश्न निर्माण झाला असून आता दंगल घडविण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. याद्वारे अशातंता निर्माण करणे व महाराष्ट्र अस्थिर आहे असे दाखवून राष्ट्रपती राजवट आणा अशाप्रकारचा घाट काहीजण घालत आहे.आमचे सरकार काेणत्याही प्रसंगाला ताेंड देण्यास समर्थ आहे.

Bhartiya Janta party state president chandrkant patil need safe constituents in next election says NCP stater president jayant patil

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात