Kolhapur Byelection : कोल्हापूर उत्तर मध्ये जिंकली काँग्रेस; हरला भाजप; पण दणका मात्र शिवसेनेला!!

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत जो निकाल आला आहे, त्यातली आकडेवारी आणि मताधिक्‍य यांच्या पलिकडे जाऊन बघितले असता काँग्रेस जिंकली, भाजप हरला, पण दणका मात्र शिवसेनेचा बसला आहे, हेच स्पष्ट दिसून येत आहे…!! याचे कारण उघड आहे, शिवसेनेने आपला बालेकिल्ला काँग्रेसला आंदण देऊन कायमचा गमावला आहे. Kolhapur Byelection: Congress wins in Kolhapur North; Harla BJP; But hit Shiv Sena !!

वास्तविक कोल्हापूर मध्ये हिंदुत्ववादी पक्षांना पूर्णपणे अनुकूल वातावरण तयार करण्याचे काम शिवसेनेने फार कष्टपूर्वक उभे केले होते. यामध्ये राजेश क्षीरसागर यांचा वाटा अतिशय मोलाचा होता. कोल्हापूर उत्तर मतदार संघाची राजकीय बांधणी राजेश क्षीरसागर यांनी उत्तम केली होती. परंतु 2019 च्या निवडणुकीत अनपेक्षितरीत्या काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे त्यांना हा एका निवडणुकीपुरता धक्का आहे, असे वाटत असतानाच दरम्यानच्या काळात कोरोनामुळे चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले. त्यानंतरच्या कारण परंपरेतून शिवसेनेला आपला बालेकिल्ला गमवावा लागला आहे.



चंद्रकांत जाधव त्यांच्या पत्नी जयश्री जाधव या खरेतर भाजपच्या नगरसेविका, पण त्यांनी उमेदवारी काँग्रेसची घेतली आणि आता एकेकाळी शिवसेनेचा मजबूत बालेकिल्ल्यात काँग्रेसच्या उमेदवार म्हणून त्यांनी बाजी मारली आहे. 5 वर्षांच्या अंतराने नसेल, अगदी अडीच वर्षाच्या छोट्या अंतराने असेल परंतु काँग्रेसने कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून दोन वेळा बाजी मारल्याने काँग्रेस या मतदारसंघावर आता आपला कायमचा हक्क सांगणार आहे आणि हाच दणका राजेश क्षीरसागर अर्थातच शिवसेना यांच्यासाठी अधिक निर्णायक ठरला आहे. राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर उत्तर मधून 3 वेळा म्हणजे सलग 15 वर्षे आमदार होते. 15 वर्षाची बालेकिल्ल्यातली आमदारकी राजेश क्षीरसागर यांनी फक्त एका निवडणुकीत गमावली आणि शिवसेनेला मात्र या मतदारसंघावर आता कायमचे पाणी सोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हिंदुत्ववादी मतदारांचे हे दुर्दैव आहे. हिंदुत्ववादी पक्षांमध्ये फूट पडल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे असे फावले आहे. कोल्हापूरचा निकाल हा हिंदुत्ववादी पक्षांना खऱ्या अर्थाने “सांगावा” आहे. हिंदुत्ववादी मतदार टिकून आहे. किंबहुना तो वाढतो आहे पण हिंदुत्ववादी पक्षांमध्ये फूट पडल्याने तो मतदार निर्णायकरित्या प्रभावी ठरू शकत नाही, हे ते दुर्दैव आहे…!!

अन्यथा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने किती पुरोगामित्वाच्या बाता मारल्या की कोल्हापूर पुरोगामी आहे शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचाराचे आहे त्यामुळे काँग्रेसचा विजय झाला असे जरी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कितीही उच्चरवात सांगितले तरी हिंदुत्ववादी पक्षांमधील फूटच काँग्रेसच्या पथ्यावर पडली हीच राजकीय वस्तूस्थिती यातून समोर येताना दिसते आहे.

निवडणुकीच्या बेरीज-वजाबाकी च्या राजकारणात निदान महाराष्ट्रात तरी काँग्रेस-राष्ट्रवादी बेरकीपणा भाजपच्या अजून बरेच पुढे आहेत हेच यातून स्पष्ट झाले आहे. भाजपचे कार्यकर्ते मेहनत घेतात. दिवस-रात्र कष्ट उपसतात. त्यांना मतदारही प्रतिसाद देतात यात शंका नाही. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या बेरकीपणापुढे भाजपच्या कार्यकर्त्यांना पीछेहाट सहन करावी लागते. भाजपचे महाराष्ट्रातले नेतृत्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाकडे फिके पडते ते याच मुद्द्यावर…!! कोल्हापूरचा निकालाचा “सांगावा” तरी निदान हेच सांगतो…!!, याकडे भाजपचे केंद्रातले आणि महाराष्ट्रातले नेते वेगळ्या दृष्टीने पाहतील…??

Kolhapur Byelection : Congress wins in Kolhapur North

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात