जबलपूर येथून नागपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
विशेष प्रतिनिधी
नागपूर : शहरातील भाजपा नेत्या सना खान यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपी पप्पू उर्फ अमित शाहू याला जबलपूर येथून अटक केली आहे. चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली आहे. The accused who was arrested in the BJP leader Sana Khan murder case has confessed to the crime
नागपूर पोलीस आरोपीला घेऊन शुक्रवारी रात्री उशिरा किंवा शनिवारी सकाळी नागपुरात पोहोचतील. नागपूर शहर झोन-२ चे डीसीपी राहुल मदने यांनी याला दुजोरा दिला आहे.
विशेष म्हणजे, भाजपा नेत्या सना खान 1 ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. त्या त्यांच्या बिझनेस पार्टनरला भेटण्यासाठी मध्य प्रदेशातील जबलपूरला गेल्या होत्या. सना यांनी घरच्यांना सांगितले होते की, त्या दोन दिवसांत परत येतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more