‘तुकडे-तुकडे गँगचे समर्थकच भारत मातेच्या हत्येबद्दल बोलू शकतात’, अनुराग ठाकूर यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल!


‘’अशा भाषेतून राहुल यांची मानसिकता कळते, मणिपूरमध्ये काँग्रेसने द्वेषाची बीजे पेरली’’ असा अनुराग ठाकूर यांनी केला आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी, ११ ऑगस्ट रोजी सांगितले की, ‘’फक्त तुकडे तुकडे गँगचे समर्थकच भारत मातेच्या विरोधात बोलू शकतात,  केवळ तेच भारत मातेच्या हत्येबाबत बोलू शकतात.’’ Union Minister Anurag Thakur criticizes Rahul Gandhi

केंद्रीय माहिती, प्रसारण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज (शुक्रवारी) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले आहे की, “तुकडे-तुकडे टोळीचे समर्थकच ‘भारत माते’ला तोडण्याचा, मारण्याचा विचार करू शकतात. त्यांना मणिपूरच्या महिलांची चिंता नाही. ते संविधानाबद्दल, भारत मातेच्या हत्येबद्दल बोलतात. राहुल गांधींना राजस्थानच्या महिलांची चिंता नाही, तुम्ही पश्चिम बंगाल, बिहार, मणिपूरच्या महिलांमध्ये फरक करतात.”

राहुल गांधी यांनी प्रदीर्घ कालावधीनंतर संसदेत पुनरागमन केले होते, मात्र येताच त्यांनी असे वक्तव्य केले होते, जे लवकरच वादाचा विषय बनले आहे. लोकसभेत निवेदन करताना गांधी यांनी मणिपूरचे दोन तुकडे केल्याचा आरोप केला. राहुल म्हणाले की, तुम्ही (भाजप) मणिपूरचे दोन भाग केले आहेत. त्यांनी मणिपूरमध्ये (भाजप) भारतमातेची हत्या केली आहे. देशद्रोही आहात, तुम्ही देशभक्त नाही, त्यामुळे पंतप्रधान मणिपूरला जाऊ शकत नाहीत. तुम्ही भारतमातेचे रक्षक नाही, भारतमातेचे मारेकरी आहात.’

याशिवाय अनुराग ठाकूर यांनीही काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला असून ‘’मणिपूरमध्ये काँग्रेसने द्वेषाची बीजे पेरली, मणिपूर पूर्वी हिंसेसाठी ओळखले जात होते. गृहमंत्र्यांनी आणलेला शांतता प्रस्ताव काँग्रेसला मान्य नव्हता. काँग्रेस शांततेऐवजी आगीत तेल ओतत आहे. राहुल गांधी यांनी भारत मातेच्या मृत्यूचे भाष्य केलं आहे, अशा भाषेतून राहुल यांची मानसिकता कळते.’’ असं त्यांनी म्हटलं आहे.

Union Minister Anurag Thakur criticizes Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात