Niger Crisis: नायजरमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायजरी जारी, लवकरच भारतात परतण्याचा सल्ला

लष्करी बंडानंतर निदर्शने आणि हिंसाचारात वाढ झाली आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांना लवकरात लवकर नायजर सोडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच नियामे येथील भारतीय दूतावासात नोंदणीकृत नसलेल्यांनी हे काम त्वरित करावे, असेही सांगितले. सध्या नायजरमध्ये 250 भारतीय राहतात. लष्करी बंडानंतर निदर्शने आणि हिंसाचारात वाढ झाली आहे. Niger Crisis Advisory issued for Indians living in Niger advised to return to India soon

परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे की, नायजरमध्ये जाण्याची योजना आखणाऱ्यांनी तेथील परिस्थिती सुधारेपर्यंत जाणे टाळावे. त्यांनी त्यांच्या प्रवासाचा पुन्हा विचार करायला हवा. मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, भारत नायजरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

नायजरमध्ये २६ मे रोजी सत्तापालट झाला होता. सत्तापालटानंतर लष्कराने राष्ट्राध्यक्षांना हटवून सत्ता काबीज केली. यानंतर अध्यक्षांना ताब्यात घेण्यात आले. अमेरिका, युरोपसह संयुक्त राष्ट्रांनी यावर चिंता व्यक्त केली होती.

Niger Crisis Advisory issued for Indians living in Niger advised to return to India soon

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात