NCP : लोकशाहीच्या नावाने नुसताच धिंडोरा; प्रत्यक्षात पक्ष चालवताना काकांचा हुकूमशाहीचाच बडगा!!


राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने कायदा आणि नियमानुसार निकाल दिला. वयाच्या 84 व्या वर्षी शरद पवारांच्या हातातून त्यांनीच स्थापन केलेला पक्ष निसटला. लोकशाहीच्या नावाने नुसताच धिंडोरा प्रत्यक्षात पक्ष चालवताना काकांचा हुकूमशाहीचाच बडगा!!, हा अजित पवार गटाने केलेला युक्तिवाद निवडणूक आयोगाने कायदा आणि नियमानुसार मान्य केला. Sharad pawar lost NCP because he couldn’t prove democratic progress in his own party

आता पवारांनी केव्हाही पत्रकार परिषद घेऊन लोकशाहीचा गळा घोटला वगैरे बाता मारल्या, तरी निवडणूक आयोगाने 6 महिन्यांमध्ये घेतलेल्या 10 सुनावण्यांमध्ये त्यांना आपण स्वतःच लोकशाही मार्गाने आपला पक्ष चालवत होतो, हे सिद्ध करता आले नाही, ही वस्तुस्थिती लपणार नाही. भले शरद पवार आणि त्यांचा गट निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देईलही, पण त्यामुळे निवडणूक आयोगातल्या युक्तिवादात स्वतः पवार आणि त्यांचा गट कायद्याच्या कसोटीवर हरला ही बाब लपून राहणार नाही. उलटी अधिक ठळकपणे अधोरेखित होत राहील.



मोदी सरकारच्या काळात लोकशाहीचा गळा घोटला जातो. निवडणूक आयोग आणि बाकीच्या केंद्रीय तपास यंत्रणा वापरून मोदी सरकार विरोधकांना नामोहरम करते वगैरे आक्रस्ताळी भाषा पत्रकार परिषदेत “शोभली”, तरी प्रत्यक्ष निवडणूक आयोगात कायद्याच्या कसोटीवरची कागदपत्रे आणि पुरावे सादर करावे लागतात. ते सादर करण्यात आधी उद्धव ठाकरे अपयशी ठरले आणि त्यानंतर शरद पवारांसारखा चाणाक्ष नेताही अपयशी ठरला.

उपस्थित राहूनही अपयशी

वास्तविक उद्धव ठाकरे शिवसेनेच्या निर्णयासंदर्भात निवडणूक आयोगाच्या कुठल्या सुनावणीला स्वतः कधीच उपस्थित राहिले नाहीत. त्याउलट पहिल्या तीन सुनावण्यांमध्ये तरी स्वतः शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे सलग उपस्थित राहत होते. वकिलांशी सल्लामसलत करत होते. स्वतः पुराव्यांची छाननी करण्यामध्ये पुढाकार घेत होते. परंतु एवढे सगळे करूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपणच स्थापन केला आणि तो आपण लोकशाही मार्गाने चालवत होतो, हे सिद्ध करणारी कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्यात शरद पवार आणि त्यांच्या समर्थकांना अपयश आले आणि त्यामुळेच त्यांनी स्वतःच स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष आणि निवडलेले घड्याळ नावाचे चिन्ह त्यांच्या हातातून निसटले.

नव्याने सुरुवात करण्याची वेळ

पवारांना वयाच्या 84 व्या वर्षी नव्याने सुरुवात करण्याची वेळ आली. कारण आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी लोकशाही मार्गाने निवडून आलो, आपल्या पक्षाची कार्यकारणी आपण लोकशाही मार्गाने निवडून आणली, बाकीची सर्व पदे लोकशाही निवडणूक मार्गाने भरली, हे शरद पवार आणि त्यांचे समर्थक सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या हातातून पक्ष निसटला. दररोज वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जाऊन बाईट देणारे कुठलेही घटनातज्ञ आणि राजकीय विश्लेषक शरद पवारांना प्रत्यक्ष निवडणूक आयोगात युक्तिवादाच्या वेळी किंवा पुरावे सादर करताना उपयोगी पडू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती देखील आजच्या निकालाने अधोरेखित झाली.

उद्या ठरणार पवारांच्या पक्षाचे नाव

निवडणूक आयोगाने शरद पवारांना उद्या 7 फेब्रुवारी दुपारी 3.00 वाजेपर्यंत स्वतःच्या पक्षाचे नवे नाव आणि नवे चिन्ह याचे प्रत्येकी तीन पर्याय देण्याची सूचना केली आहे. शरद पवार स्वतःच्या पक्षासाठी कोणता कोणते नाव आणि कोणते चिन्ह निवडतील??, याची आता उत्सुकता आहे. पण आपणच स्थापन केलेला पक्ष कायद्याच्या कसोटीवर ते स्वतःच्या ताब्यात ठेवू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती सगळ्या महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर आली आहे.

Sharad pawar lost NCP because he couldn’t prove democratic progress in his own party

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात