ज्या पद्धतीने राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एका सूत्राने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकीय दृष्ट्या टार्गेट केले आहे, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीस आणि राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. एकूण या दोन्ही नेत्यांची राजकीय पंगा वाढवायची तयारी राष्ट्रवादीने केल्याचे दिसून येत आहे.Fadnavis – NCP’s readiness to escalate tensions with Raj Thackeray
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी एकाच वेळी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांना टार्गेट करत प्रत्युत्तरे दिली आहेत. एकीकडे वळसे पाटलांनी राज ठाकरे यांचे मशिदींवरचे भोंगे काढण्याचे आव्हान मुदतीपूर्वी फेटाळून लावले आहे, तर दुसरीकडे फडणवीसांनी जी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले आहे त्याला प्रत्युत्तर देखील दिले आहे.
शरद पवारांवर टीका करण्याचा अनेकांना छंद आहे, अशा शब्दात वळसे पाटलांनी फडणवीसांना टोचले आहे. 1993 चे बॉम्बस्फोट ते “द काश्मीर फाईल्स” या सर्व विषयांवर शरद पवारांनी मुस्लिमधार्जिणी भूमिका घेतल्याची टीका फडणवीस यांनी केली होती. या मुद्द्यावर प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी कधीही जातिवादी भूमिका घेतली नाही. देशाची धर्मनिरपेक्ष भूमिका कायम राहावी हीच राष्ट्रवादीची भूमिका पवार मांडत राहिले आहेत. 370 कलमा बाबत पवार आणि काँग्रेसची भूमिका सर्वज्ञात आहे, असे प्रत्युत्तर वळसे पाटील यांनी फडणवीस यांना दिले आहे. शरद पवारांवर आत्तापर्यंत अनेकदा टीका झाली आहे. परंतु त्यांनी धर्मनिरपेक्ष भूमिका बदललेली नाही. फडणवीसांना देखील पवारांवर टीका करायचा छंद लागलेला दिसतो आहे, अशा शेलक्या शब्दात वळसे पाटलांनी फडणवीसांचा समाचार घेतला आहे.
– भोंगे काढणार नाही; ठाकरे – पवार सरकारचा राज ठाकरेंशी उभा पंगा!!
तर, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे काढण्यासाठी ईद 3 मे रोजी पर्यंतची मुदत ठाकरे – पवार सरकारला दिली होती. परंतु त्या मुदतीची वाट न बघता सरकारने भोंगे काढणार नाही, अशी भूमिका घेऊन राज ठाकरेंचे आव्हान धुडकावले आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत आज सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकार सर्व धर्मीयांना बरोबर घेऊन चालणारे आहे. परवानगी देऊन लावलेले भोंगे काढायचे कोणतेही आदेश कोर्टाने दिलेले नाहीत. त्यामुळे मंदिरे – मशिदींवरचे भोंगे काढणार नाही. त्याचबरोबर कोर्टाने रात्री 10.00 ते सकाळी 5.00 विशिष्ट आवाजाचे डेसिबल ठरवून दिलेले आहेत, असे दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात आणि ठाण्यातल्या उत्तर सभेत मशिदींवरचे भोंगे काढावेत अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशारा ठाकरे – पवार सरकारला दिला होता. यासाठी त्यांनी ईद 3 मे पर्यंतची मुदत दिली होती. परंतु ठाकरे – पवार सरकारने त्या मुदतीची वाट न पाहता राज ठाकरे यांचा इशारा धुडकावला आहे. त्यामुळे ठाकरे – पवार सरकार हे राज ठाकरे यांच्याशी राजकीय पंगा तयार झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App