अबकी बार NDA 400 पार, भाजपा 370; पंतप्रधान मोदींनी लोकसभेतल्या भाषणात सेट केले “टार्गेट”!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेससह देशातले विरोधक पुढच्या अनेक दशकांमध्ये लोकसभेत सभापतींच्या डाव्या बाजूलाच म्हणजे विरोधातच बसतील. त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत जाईल, असे भाकित वर्तवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत NDA साठी अबकी बार 400 पार ही घोषणा दिली, तर भाजपसाठी 370 चे टार्गेट ठेवले.Abaki Bar NDA 400 Par, BJP 370; Prime Minister Modi set “Target” in his speech in Lok Sabha!!

संपूर्ण देशात अबकी बार 400 पार हा नारा घुमत आहे. मी साधारणपणे आकड्यांच्या खेळात पडत नाही. पण मी देशाचा मूड पाहतोय. यावेळी NDA 400 हून अधिक जागा जिंकेल, तर भाजप 370 जागा जिंकेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. आमचा पुढील कार्यकाळ 1000 वर्षांच्या समृद्ध आणि सशक्त भारताची पायाभरणी करणारा असेल, असेही ते म्हणाले.



राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी काँग्रेससह विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. खासदारांच्या ताकदीमुळेच आपण 370 कलम रद्द केले. आपण 370 कलम रद्द होताना पाहिलं. अंतराळापासून ऑलिम्पिकपर्यंत नारी शक्तीची ताकद वाढली आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत रखडलेल्या योजनाही निर्धारित वेळेत पूर्ण होताना पाहिल्या आहेत. आम्ही इंग्रजांचे जाचक आणि आऊटडेटेड कायदे हटवून न्याय संहिता अधिक मजबूत केली आहे. काही कामाचे नव्हते असे शेकडो कायदे आम्ही रद्द केले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

तिसऱ्या कार्यकाळाला, फक्त…

भारताच्या महान परंपरेला ऊर्जा देणारं मंदिर देशात निर्माण झालं आहे. त्यामुळे आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ दूर नाहीये. फार फार 100 ते 125 दिवस बाकी आहेत. संपूर्ण देशात आतापासूनच ‘अब की बार मोदी सरकारचा नारा’ घुमू लागला आहे. भाजपच्या 370 तर एनडीएला 400 जागा लोक देतीलच, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

ओबीसीच्या मुद्द्यावरून हल्ला

काँग्रेसवाले ओबीसींवरून खूप चिंतेत आहेत. सरकारमध्ये किती ओबीसी आहेत याचा ते हिशोब मागत आहेत. मला आश्चर्य वाटतं. त्यांना मी दिसत नाहीये का? सर्वात मोठा ओबीसी दिसत नाही का? माझ्यासारखे ओबीसी काँग्रेसला दिसत नाही? त्यांच्या संस्थेत किती ओबीसी होते? असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला विचारला.

महागाईवर नियंत्रण…

यावेळी पंतप्रओधान नरेंद्र मोदी यांनी महागाईवर नियंत्रण ठेवल्याचा दावा केला. आमच्या सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवलं आहे. दोन दोन युद्ध झाल्यावरही आमच्या सरकारने महागाई रोखून धरली. पूर्वी सभागृहाचा पूर्णवेळ घोटाळ्यांवरील चर्चांमध्ये जात होता. 1974 मध्ये जेव्हा इंदिरा गांधी यांनी प्रत्येक ठिकाणी टाळे लावले होते. देशात 30 % महागाई होती. जमीन नसेल तर रोप लावण्याच्या भांड्यात भाज्या उगवा, असे सांगितले जात होतं. देशात महागाई एवढी वाढली होती की त्यावरील गाणीही लोकप्रिय ठरली आहेत. ही दोन्ही गाणी काँग्रेसच्या सत्ता काळात आली होती, अशी टीका त्यांनी केली.

Abaki Bar NDA 400 Par, BJP 370; Prime Minister Modi set “Target” in his speech in Lok Sabha!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात