आज दुपारी ३ वाजता सुटणाऱ्या दापोली-ठाणे या शिवशाही बसवर त्यांची ड्युटी होती. प्रवाशांना घेऊन ते ठाण्याकडे मार्गस्थ झाले. Ratnagiri: ST driver on duty with bangles in his hand
विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : मागील काही दिवांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आत्तापर्यंत ३१ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे.दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी आगारातील चालक अशोक वनवे हे आज चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर झाले. आज दुपारी ३ वाजता सुटणाऱ्या दापोली-ठाणे या शिवशाही बसवर त्यांची ड्युटी होती. प्रवाशांना घेऊन ते ठाण्याकडे मार्गस्थ झाले.
चालक अशोक वनवे हे मुळचे बीड येथील असून ते नोकरीनिमित्त दापोलीत वास्तव्यास आहे. ST चालक अशोक वनवे यांनी सांगितले की,आपल्या पत्नीने कामावर जाऊ नका, गेलात तर हातात बांगड्या भरून जा असे सांगितले तसेच कामावर न आल्यास मेमो मिळेल ही भिती होती.आमचे एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत त्यामुळे यंदा आमच्या कुटुंबाने दिवाळी साजरी केली नाही.
पुढे अशोक वनवे म्हणाले की , अवघ्या १३ हजार रुपये पगारात आम्ही घर कसे चालवायचे हा प्रश्न आमच्या समोर आहे. एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत त्यामुळे शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा असे वनवे म्हणाले. आमच्या मागण्याना आता आश्वासने नकोत तर आमचे दुःख समजुन घेऊन सकारात्मक निर्णय शासनाने घ्यावा अशी प्रतिक्रिया त्यानी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App