नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (रविवारी) पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही राजकीय चिमटे काढले आहेत. मेट्रोचे काम अर्धवट झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तिचे उद्घाटन करणार आहेत. ठीक आहे. आमचा आक्षेप नाही असा पहिला चिमटा त्यांनी काढला आहे.Prime Minister Modi’s Bhumi Pujan project stalled in Maharashtra by Thackeray-Pawar government
त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचे या योजनेचे भूमिपूजन होत आहे, त्या मुठा नदी सुधार योजनेवर पवारांनी काही आक्षेप नोंदवले आहेत. मुठा नदीवर किती धरणे आहेत हे मला माहिती आहे. उद्या ढगफुटी होऊन कोणती दुर्घटना झाली, तर धरणातून पाणी सोडावे लागेल. आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरेल. नदीचे पात्र सुशोभीकरणाच्या नावाखाली लहान केले तर गावांना त्याचे नुकसान सोसावे लागेल, अशा शब्दांमध्ये पवारांनी मुठा नदी प्रकल्प सुधार योजनेवर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधानांनी भूमिपूजन केले तरी महाराष्ट्रातल्या जलसंपदा विभागाला त्याचा आढावा घ्यायला सांगू असे सांगत पवारांनी या योजनेचे भविष्यात नेमके महाविकास आघाडी सरकार काय करणार आहे…??, हेच सूचित केले आहे. एक प्रकारे मुठा नदी सुधार योजनेला राज्यातल्या ठाकरे – पवार सरकार मार्फत अडथळा आणण्याचा किंवा कात्री लावण्याचा प्रकार असल्याचे यातून दिसून येते.
Pune Metro fare : पुणेकरांसाठी मेट्रोचा प्रवास स्वस्त आणि मस्त… पहा भाडे किती??
अडकवून ठेवलेले प्रकल्प
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App