पाचपैकी चार राज्यांत भाजपचीच सत्ता, अमित शहा- जे. पी. नड्डा यांचा विश्वास


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सध्या निवडणूक होत असलेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपचे सरकार पुन्हा येईल. कारण या पाचही राज्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता प्रचंड आहे, असा विश्वास पक्षाच्या केंद्रीय गृहमंत्रक्ष अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला आहे.BJP is in power in four out of five states, Amit Shah-J. P. Nadda believes

चार राज्यांत जनता भाजपला बहुमत देईल, असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा तसेच मणिपूरमध्ये पुन्हा भाजपची सत्ता येईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशात तर पक्षाला प्रचंड बहुमत मिळेल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला आहे. काही नेत्यांनी पक्ष सोडला असला तरी त्याचा परिणाम मतदारांवर होणार नाही.



भाजपने सर्वच राज्यांमध्ये नियोजनबद्ध प्रचारमोहीम राबविल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाचही राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता प्रचंड आहे असे शहा यांनी म्हटले आहे.उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि भाजप यांच्यात सरळ लढत असल्याचे मानले जात आहे.

मात्र, मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाची भूमिका महत्वाची राहणार आहे. गोव्यात भाजपला कॉँग्रेस, आप आणि तृणमूल कॉँग्रेस यांचे आव्हान आहे. उत्तराखंडमध्ये भाजप- कॉँग्रेस आणि आपची लढत आहे. पंजाबमध्ये मात्र कॉँग्रेस आणि आप हेच शर्यतीचे दावेदार असल्याचे म्हटले जात आहे.

BJP is in power in four out of five states, Amit Shah-J. P. Nadda believes

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात